जगातील सर्वात घाणेरडा व्यक्ती म्हणून अनधिकृत विक्रम नावावर असलेल्या इराण येथील व्यक्तीचा मंगळवारी वयाच्या ९४ व्या वर्षी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे नाव अमौ हाजी (Amou Haji) असे असून त्याला ‘जगातील सर्वात घाणेरडा माणूस’ म्हणून ओळखले जाते. गेल्या ५० पेक्षा अधिक वर्षांहून त्याने अंघोळ केली नव्हती. ६५ वर्षांपूर्वी त्याने शेवटची अंघोळ केली असेही सांगितले जात आहे.
(हेही वाचा – दिवाळीच्या फटाक्यांच्या वाढत्या आवाजामुळे आरेतल्या बिबट्याच्या अधिवासाला पोहोचतोय धक्का…)
आईआरएनए समाचारने दिलेल्या माहितीनुसार, अमौ हाजी हा अविवाहित असून त्याला अंघोळीचा प्रचंड कंटाळा होता. अंघोळ करताना वापरल्या जाणाऱ्या साबण आणि पाण्याने आपण आजारी पडू, अशी त्याला भिती वाटायचे. गेल्या काही महिन्यांपूर्वी गावातील लोकांनी त्याला अंघोळीसाठी नेले होते. बऱ्याच वर्षांनंतर अंघोळ केल्याने अमौ हाजीची तब्येत बिघडली आणि त्यानंतर काही दिवसांनीच त्याचा मृत्यू झाला.
IRNA नुसार, त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला. २०१३ मध्ये या व्यक्तीवर ‘द स्ट्रेंज लाइफ ऑफ अमौ हाजी’ नावाची डॉक्युमेंट्री देखील बनवण्यात आली होती. अमौ हाजी आपले जीवन कसे जगतात हे यामध्ये दाखवण्यात आले होते. तसेच हाजी रस्त्याच्या कडेला मरून पडलेले जनावरे खायचा. हाजीला धुम्रपान देखील करायचा. त्याला साळींदरचे मांस खायला आवडायचे. गावकऱ्यांनी त्यासाठी गावाबाहेर एक घर बनवले होते. हाजीच्या मृत्यूनंतर त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Join Our WhatsApp Community