गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने जगभरात कहर केला होता. अद्याप कोरोना महामारी पूर्णतः नाहिसी झाली नसून कोरोना लस कशी फायदेशीर ठरेल याकरता प्रत्येक देश प्रयत्नशील आहे. अशातच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीला परवानगी देणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे.
तिआन्जिनमधल्या कॅनसिनो बायोलॉजिक्स या कंपनीने ही नाकावाटे दिली जाणारी लस तयार केली असून चीनच्या औषध प्रशासाने कॅनसिनोची Ad5-nCoV ही लस आपत्कालिन वापरासाठी बुस्टर डोस म्हणून वापरण्यास परवानगी दिली आहे.
(हेही वाचा – मुंबई महापालिका निवडणूक भाजपा-शिंदे गट एकत्र लढणार! शाहांकडून 150 जागांचे टार्गेट)
हाँगकाँगमध्ये आज, सोमवारी सकाळी या कंपनीच्या शेअर्समध्ये १४.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. नाकावाटे दिली जाणारी ही पहिलीच कोरोना प्रतिबंधक लस आहे. या लसीमुळे पेशींच्या रोगप्रतिकारक्षमतेत वाढ होणार असून थेट स्नायूमध्ये इंजेक्शन न देताच ही लस सुरक्षा देणार आहे. कोरोनावर मात करणाऱ्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या आणखी काही लसींवर वैज्ञानिक संशोधन करत आहेत. कॅमसिनोकडून सुरूवातीला टोचली जाणारी लस कोरोना विरोधात ६६ टक्के प्रभावी होती, तसेच गंभीर आजारांवर ९१ टक्के प्रभावी होती.