मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात मोठ्या विमानाची ग्रँड एन्ट्री झाली आहे. एअरबस बेलुगा (Airbus Beluga) असे या नागरी उपयोगासाठी असणाऱ्या विमानाचे नाव असून या विमानाला पाहून विमानतळावर असलेले प्रवासीही अवाक् झालेत. या विमानाबरोबरच प्रवासी वाहतुकीत जगात सर्वाधिक अत्याधुनिक असलेले Embraer E192-E2 प्रॉफिट हंटर हे विमानही मंगळवारी मुंबईत दाखल झाले. या दोन्ही मोठ्या विमानांची मुंबई विमानतळावर पहिल्यांदाच ग्रँड एन्ट्री झाली.
(हेही वाचा –मेटा, ट्विटर, गुगल सारख्या दिग्गज कंपन्यांनंतर आता ‘या’ कंपनीचा मोठा निर्णय, 6 हजार कर्मचारी करणार कमी )
Guess who’s back! It’s the whale again! One of the world’s largest aircraft @Airbus #Beluga (No. 3) landed at #KolkataAirport for crew rest and refueling. Here are few glimpses of the majestic beast from the #CityofJoy. #Airbus #BelugaAircraft #BelugaWhale pic.twitter.com/Obx50PjSTv
— Kolkata Airport (@aaikolairport) November 20, 2022
काय आहेत वैशिष्ट्ये
- एअरबस कंपनीचे ‘ए300-600 एसटी’ हे ‘बेलुगा’ या नावाने ओळखले जाणारे विमान असून विमान 51 टन मालवाहू क्षमतेसह जगातील सर्वात मोठे विमान आहे.
- वैमानिक खाली व विमानाचा मुख्य भाग त्याच्यावर आहे. खालील भागापेक्षा दुप्पटीने वरचा भाग मोठा आहे.
- अत्यंत वेगळ्या आकारातील हे विमान असल्याने ज्यावेळी ते मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड झाले त्यावेळी सर्व प्रवासी अवाक् झालेत.
- एअर बस या विमानाला अधिकृतपणे Airbus A300-608ST सुपर ट्रान्सपोर्टर असे म्हटले जाते. याला बेलुगा यासाठी म्हटले जाते कारण त्याची रचना बेलुगा व्हेल माश्याप्रमाणे आहे.
- बेलुगा एअरबस सुपर ट्रान्सपोर्टर विमान जगातील सर्वात मोठे विमान आहे. 13 सप्टेंबर 1994 रोजी बेलुगा एअरबसचे पहिले उड्डाण झाले होते. 1992-1999 दरम्यान केवळ पाच विमाने बनवण्यात आली. एवढं मोठालं विमान फक्त दोन पायलटच उडवतात.
- हे विमान 184.3 फूट लांब आणि 56.7 फूट उंच असून 40 हजार 700 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता या विमानामध्ये आहे.