हुबळी प्लॅटफॉर्मची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, काय आहे वैशिष्टे?

262

कर्नाटकच्या हुबळी म्हणजेच सिद्धारूढ स्वामी रेल्वे प्लॅटफॉर्मची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. सुमारे २०.१ कोटी रुपये खर्चून बांधलेला दीड किलोमीटर लांबीचा हा प्लॅटफॉर्म जगातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी या प्लॅटफॉर्मचे लोकार्पण केले.

वैशिष्टे

हुबळीच्या सिद्धारुधा स्वामी रेल्वे स्थानकावरील हा प्लॅटफॉर्म दीड किलोमीटर अंतराचा आहे. या प्लॅटफॉर्मचे बांधकाम फेब्रुवारी २०२१ मध्ये सुरू करण्यात आले होते. हुबळी येथील हे जंक्शन बंगळुरु, होसापेटे आणि वास्को द गामा या ठिकाणांशी जोडले गेलेले आहे. हुबळी रेल्वे स्थानकात वाढत असलेली गर्दी पाहून आणखी तीन प्लॅटफॉर्म येथे बांधण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक ८ हा १ हजार ५०७ मीटर आहे. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म जगातला सर्वात लांब प्लॅटफॉर्म म्हणून गौरवला जातोय.

इलेक्ट्रिक इंजिन असलेल्या दोन रेल्वेगाड्या एकाचवेळी या लांब प्लॅटफार्मवरुन सुटू शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्लॅटफॉर्मच्या लोकार्पणासह ११८ किलोमीटर लांबीच्या बंगळूरु-म्हैसूर एक्स्प्रेस-वेचे उद्घाटन केले. या महामार्गासाठी ८ हजार ४८० कोटी रुपये निधी खर्च झाला आहे. त्यामुळे तीन तासांच्या प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवर येणार आहे.

(हेही वाचा – दिवा ते रत्नागिरी पॅसेंजर ‘या’ तारखेपासून होणार अधिक वेगवान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.