World’s Richest Man : लुई व्हितॉचे बर्नार्ड आरनॉल्ट यांनी पुन्हा टाकलं एल़ॉन मस्क यांना मागे

आरनॉल्ट यांनी डिसेंबर २०२२ मध्ये पहिल्यांदा मस्क यांना मागे टाकलं होतं.

226
World’s Richest Man : लुई व्हितॉचे बर्नार्ड आरनॉल्ट यांनी पुन्हा टाकलं एल़ॉन मस्क यांना मागे
World’s Richest Man : लुई व्हितॉचे बर्नार्ड आरनॉल्ट यांनी पुन्हा टाकलं एल़ॉन मस्क यांना मागे
  • ऋजुता लुकतुके

फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) यांनी पुन्हा एकदा श्रीमंतांच्या यादीत टेस्ला कंपनीचे संस्थापक अध्यक्ष एलॉन मस्क (Elon Musk) यांना मागे टाकलं आहे. फोर्ब्सच्या रिअलटाईम यादीत अरनॉल्ट यांची संपत्ती २०८.८ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी झाल्याची नोंद आहे. शुक्रवारी एका दिवसांत त्यांची संपत्ती २३.६ अब्ज अमेरिकन डॉलरनी वाढली. आणि त्यामुळे नवीन गणनेत रविवारी त्यांनी मस्क यांना मागे टाकलं. (World’s Richest Man)

मस्क यांची एकूण संपत्ती सध्या २०४.५ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे.

बर्नार्ड आरनॉल्ट (Bernard Arnault) आणि एलॉन मस्क (Elon Musk) यांच्यात मागची दोन वर्ष अव्वल स्थानासाठी रस्सीखेच सुरू आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पहिल्यंदा आरनॉल्ट यांनी मस्क यांना मागे टाकलं होतं. मस्क यांनी दोन वर्षांपूर्वी सोशल मीडिया कंपनी ट्विटर विकत घेतल्यानंतर टेस्ला या त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे त्याचं दुर्लक्ष होतंय असा लोकांचा आरोप होता. त्यातच वाढत्या महागाईमुळे टेस्लाचा खपही थोडा कमी झाला. (World’s Richest Man)

आणि परिणामी, टेस्ला कंपनीचे शेअर अमेरिकन बाजारांमध्ये सुमारे २० टक्क्यांनी पडले. यात मस्क यांचं वैयक्तिक खूप नुकसान झालं. आणि त्याचाच परिणाम आरनॉल्ट यांनी मस्क यांना मागे टाकण्यात झालं. पण, जून २०२३ मध्ये मस्क यांनी आपलं गेलेलं स्थान परत मिळवलं. (World’s Richest Man)

(हेही वाचा – Crime: अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या हिंदू मुलाची हत्या, सोशल मिडियावर व्हिडियो व्हायरल)

ही रस्सीखेच सुरू असतानाच आरनॉल्ट आणि मस्क यांनी जून २०२३ मध्ये पॅरिसमध्ये एक खाजगी बैठकही घेतली होती. आरनॉल्ट यांच्याच एका आलीशान हॉटेलमध्ये दोघं आपल्या कुटुंबीयांसमवेत एकत्र जेवले होते. (World’s Richest Man)

मस्क यांच्या उद्योजकतेबद्दल आदर असल्यामुळे त्यांना आमंत्रित केल्याची प्रतिक्रिया आरनॉल्ट यांनी तेव्हा दिली होती. बर्नार्ड आरनॉल्ट हे फ्रान्समधील उद्योजक आहेत. आणि अल्ट्रा लक्झरी प्रिमिअम फॅशन उत्पादनं आणि सेवा ते पुरवतात. लुई व्हितॉ हा त्यांच्याच मालकीचा ब्रँड आहे. (World’s Richest Man)

शेव्हल ब्लँक ही लक्झरी हॉटेल चेनही त्यांच्याच मालकीची आहे. आणि तिथेच मस्कबरोबर त्यांची भेट झाली होती. (World’s Richest Man)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.