कोल्हापुरच्या तालमीत कुस्तीचा सराव करताना ह्रदयविकाराच्या झटक्याने पैलवानाचा मृत्यू

149

कोल्हापूरातल्या तालमीत एका 23 वर्षीय पैलवानाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री ही घटना घडल्यापासून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या पैलवानाचा मृत्यू झाला त्याचे नाव मारुती सुरवसे असे आहे. मारुतीचे मुळ गाव पंढरपूर जिल्ह्यात आहे. ज्यावेळी त्याच्या वाखारी या निवासस्थानी निधनाची बातमी समजली त्यावेळी तिथे स्मशान शांतता पसरली होती.

सोमवारी अचानक कुस्तीचा सराव संपल्यानंतर मारुतीला त्रास सुरु झाला. डाॅक्टरांनी त्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे स्पष्ट केले. मारुतीच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात सुद्धा हळहळ व्यक्त केली जात आहे.

( हेही वाचा: फडणवीस- पटोले यांची भंडा-यात भेट; बंद दाराआड काय झाली चर्चा? )

उपचारादरम्यान मारुतीचा मृत्यू 

मागच्या वर्षापासून मारुती कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करत होता. सोमवारी रात्री त्याने नेहमीप्रमाणे कुस्तीचा सराव केला. त्यानंतर तो अंघोळीसाठी गेला, त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याच्यासोबत असणा-या सहका-यांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरु असताना, मारुतीचा मृत्यू झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.