- ऋजुता लुकतुके
शिआओमी कंपनीने (Xiaomi 14 Civi) आपल्या १४ सीरिजमधील नवीन फोन भारतात लाँच केला आहे. आणि त्याचं नाव आहे शिआओमी १४ सिवी (Xiaomi 14 Civi). सिवी हे ‘सिनेमॅटिक व्हिजन’ या शब्दाचं लघुरुप आहे. त्यावरून फोनची खासियतच त्याचा कॅमेरा असल्याचं तुम्हाला लक्षात आलं असेल. हिरवा, निळा आणि काळा अशा तीन रंगांत हा फोन उपलब्ध आहे. १२ जीबी रॅम तसंच ५१२ जिबी स्टोरेज असलेला फोन तुम्हाला ४४,४९९ रुपयांना मिळू शकेल. महत्त्वाचं म्हणजे हा फोन ६४ टक्के प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्प्रक्रियेतून तयार करण्यात आला आहे. (Xiaomi 14 Civi)
(हेही वाचा- ‘भावी केंद्रीय मंत्री’ म्हणत Sunetra Pawar यांचे बारामतीमध्ये बॅनर!)
१७७ ग्रॅम वजन असलेल्या या फोनची स्क्रीन क्वाड कर्व्ह डिस्प्ले असलेली आहे. भारतात अशाप्रकारचा हा पहिलाच फोन आहे. स्नॅपड्रॅगन ८ प्रोसेसरच्या तिसऱ्या पिढीचा हा फोन आहे. वेग, शक्ती आणि ऊर्जा व्यवस्थापनाच्या बाबतीत हा फोन चांगला अनुभव ग्राहकांना देणार आहे. फोनमधील बॅटरी ४,७०० एमएएच क्षमतेची आहे. त्यामुळे एकदा चार्ज केल्यानंतर २४ तासांच्या वरही फोन चालू शकतो. फोनबरोबर ६७ किलोवॅटचा फास्टट्रॅक चार्जरही देण्यात येतो. जवळ जवळ ३५ ते ४५ मिनिटांत फोन पूर्णपणे चार्ज होऊ शकतो. (Xiaomi 14 Civi)
Xiaomi 14 Civi animation test & real life image😍#Xiaomi14CIVI pic.twitter.com/CTC05RLUA1
— Sanju Choudhary (@saaaanjjjuuu) June 12, 2024
हा फोन कंपनीने फोटोग्राफी स्मार्टफोन म्हणूनच बाजारात आणला आहे. त्यासाठी फोनमध्ये आहे लिसा समिलक्स लेन्स. ५० मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा. वातावरणातील प्रकाश कसाही असला तरी फोटोतील खरे रंग आणि लुक कायम राहील अशी व्यवस्था फोनमधील सेन्सरमध्ये आहे. शिआओमी १४ सिव्हीमध्ये ५० मिमीची एक टेलिफोटो लेन्सही आहे. आणि त्याचबरोबर १२ मेगापिक्सेलची एक अल्ट्रावाईड लेन्सही आहे. (Xiaomi 14 Civi)
(हेही वाचा- Mumbai: अँटॉप हिल भागात चाळीची भिंत कोसळली, २ महिलांचा मृत्यू; कशी घडली दुर्घटना?)
लिसा लेन्स तुम्ही पाहिजे तशी सेटही करू शकता. त्यात फोटोग्राफीचे विविध मोडही आहेत. सेल्फी कॅमेरा ३२ मेगापिक्सेलचा आहे. यात वाईड लेन्सही आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेरातील प्रोग्राम सेल्फी काढताना आजूबाजूच्या सर्वांना स्वत:हून सामावून घेतो. याखेरिज फोटो एडिट करतानाही हा प्रोग्राम तुम्हाला मदत करतो. फोटोतील नको असलेल्या गोष्टी तो काढूनही टाकू शकतो. १२ जूनपासून भारतात शिआओमी १४ सिवीची ऑनलाईन विक्री सुरू झाली आहे. (Xiaomi 14 Civi)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community