वाय.के. सप्रू ‘महात्मा’ पुरस्काराने सन्मानित

‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ चे संस्थापक अध्यक्ष वाय के सप्रू यांना ‘महात्मा’ या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कर्करुग्णांना सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी केलेल्या दार्शनीक कार्याच्या सन्मानार्थ वाय के सप्रू यांचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार निवृत्त पोलिस अधिकारी किरण बेदी आणि सामाजिक कार्यकर्ते, संस्थापक अमीत सचदेव आणि सी.एस.आर.चे प्रणेते डॉ. भारतीय यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा जीवन गौरव पुरस्कार सोहळा ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ नवी दिल्ली येथे महात्मा दिनाच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात नीरजा बिर्ला, हर्ष मरीवाला, डॉ. दारुशाह, सरदार देवेंद्रपाल सिंग, रवीश कुमार या प्रभुतींना देखील त्यांच्या क्षेत्रातील विशेष कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजासाठी रचनात्मक कार्य करणा-या जागतिक पातळीवरील व्यक्ती तसेच संस्था, ज्यांनी त्यांचे विशेष कौशल्य, बुध्दी आणि संसाधने यांचे योगदान सामाजिक उन्नती व कल्याणकारी उपक्रमांसाठी दिले आहे, अशांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ‘कर्करोगाचे संपूर्ण नियोजन’ या एकाच ध्येयाने प्रेरीत होऊन वाय.के. सप्रू यांनी गेली ५२ वर्षे सातत्याने निःस्पृहपणे कार्य केले. त्यांच्या कार्याचा गौरव आणि सन्मान प्रित्यर्थ हा ‘महात्मा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

(हेही वाचा : चित्रा वाघ बनल्या राष्ट्रीय नेत्या! ‘ही’ मिळाली जबाबदारी!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here