-
ऋजुता लुकतुके
यामाहा कंपनी आपली नवीन प्रिमियम प्रकारातील बाईक बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. यामाहाच्या आर सीरिजमधील ही तिसऱ्या पिढीतील बाईक आहे आणि तिची किंमत चार लाखांच्या घरात आहे. यावर्षी भारतात होणाऱ्या भारतीय मोटोजीपी शर्यत होणार आहे आणि त्यामुळे देशात प्रिमिअम बाईक क्षेत्रात आता मोठी हलचल दिसत आहे. यात यामाहा कंपनीही आपल्या आर३ आणि एमटी०३ या दोन बाईक डिसेंबरमध्ये बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. (Yamaha R3)
२०२० मध्ये देशात पर्यावरण विषयक नियमांमध्ये काही बदल झाले. त्यानंतर कंपनीला आर३ ही स्पोर्टप्रिमिअम बाईक बंद करावी लागली होती. पण, आता ते नवीन रुपात ही बाईक परत आणणार आहेत. दोन्ही बाईक सीबीयू इंडोनेशियामधून आयात होणार आहेत. सीबीयू म्हणजे कम्प्लिटली बिल्ट अप युनिट. म्हणजेच कंपनीच्या मूळ कारखान्यात तयार होऊन बाहेरच्या देशात निर्यात होणारी उत्पादन. (Yamaha R3)
2023 Yamaha R3 Launch Price 726k JPY (Rs 4.4 Lakh) – New Features https://t.co/w9zQIKoqM2 pic.twitter.com/QoHLek5vSl
— RushLane (@rushlane) May 10, 2023
(हेही वाचा – Relationship Declaration : ओळख अथवा लग्न लपवून संबंध ठेवल्यास आता होणार मोठी शिक्षा; सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत)
इथं या बाईक इंडोनेशियात तयार होणार आहेत आणि तिथून भारतात ती आयात होतील. नवीन आर३ बाईकमध्ये अनेक मूलबूत बदल कंपनीने केले आहेत. नवीन स्टाईल आणि डिझाईन, एलईडी हेडलँप्स आणि युएसडी फोर्क या बाईकमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ६ स्पीड गियरबॉक्स असून ३२१ सीसी क्षमतेचं ट्विन इंजिन या बाईकमध्ये आहे. एका लीटरमध्ये गाडी साधारण १९ किमीपर्यंत धावू शकते. स्पोर्ट प्रिमिअम श्रेणीच्या या बाईकची किंमत ४ लाख रुपयांपासून पुढे सुरू होईल, असाच अंदाज आहे. या बाईकची स्पर्धा कावासाकी निंजा ४०० आणि एप्रिलिया आरएस ४५७ या बाईकशी असेल. (Yamaha R3)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community