Yamunabai Savarkar यांची भगूर येथील सावरकर स्मारकात जयंती साजरी

33

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील भूमिकेसाठी त्याग, धैर्य आणि समर्पणाचे उदाहरण देणाऱ्या वीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई (माई) यांची 4 डिसेंबरला 136 वी जयंती आहे. भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ही जयंती साजरी करण्यात आली.

वीरपत्नी यमुनाबाई (माई) विनायक सावरकर (Yamunabai Savarkar) यांची जयंती साजरी झाली तेव्हा डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या हस्ते माईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पर्यटक गीता कुलकर्णी, श्रीपाद अपराजीत, विकास आढे, स्मारकाचे व्यवस्थापक भूषण कापसे, मनोज कुवर, खंडू रामगडे, वैभव भागवत आदी उपस्थित होते.

(हेही वाचा Eknath Shinde म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या मनाचा मोठेपणा…)

माईंच्या जीवनाची कहाणी आजच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. माईंचे जीवन हे स्वातंत्र्यासाठी पतीपासून वेगळे होण्याच्या दुःखाने सुरू झाले. 22व्या वर्षीच त्यांना हे कठीण वास्तव स्वीकारावे लागले. वीर सावरकरांवर ब्रिटिशांनी दोन जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आणि अंदमानच्या काळ्या पाण्यात पाठवले. यामुळे माईंच्या (Yamunabai Savarkar) आयुष्याचा मार्ग वेदना, संघर्ष आणि सामाजिक बहिष्कारांनी व्यापला. मात्र, या सगळ्या संकटांवर त्यांनी संयमाने मात केली. माईंचे जीवन आजच्या महिलांसाठी प्रेरणा आहे, जे आपल्या जबाबदाऱ्या सांभाळताना संकटांवर मात करू इच्छितात. यमुनाबाई सावरकर (Yamunabai Savarkar) या भारतमातेच्या नि:स्वार्थ सेविकेचा आदर्श आजही काळाच्या परिघात झळाळत राहतो. त्याग, धैर्य आणि समर्पण या शब्दांना नव्या उंचीवर नेणारं माईंचे जीवन स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रियांच्या भूमिकेसाठी आदर्शवत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.