‘यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली- बालसंस्कार’ हे पुस्तक प्रकाशित

118

योग विद्या निकेतन या संस्थेच्या सदस्या मंजिरी फडणीस यांनी लिहिलेल्या यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली बालसंस्कार या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत 14 नोव्हेंबर 2022 ला दामले योग केंद्र माटुंगा येथे सायंकाळी ६ वाजता झाले. या पुस्तकाचे प्रकाशन वयम मासिकाच्या संपादक शुभदा चौकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्या अलका आणि योगगुरु सदाशिव निंबाळकरदेखील उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी पुस्तकाच्या लेखिका मंजिरी फडणीस म्हणाल्या की, प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचे बालपण आनंददायी व्हावे असे वाटत असते. त्यामुळे मुलांचे बालपण आनंदी होण्यासाठी मुलांवर कोणते संस्कार करावेत, त्याबाबत या पुस्तकात लिहिल्याचे त्या म्हणाल्या.

( हेही वाचा: अवघ्या तीन दिवसांत ससाणे यांचे बदली आदेश रद्द, कांदिवली विभागाच्या सहायक आयुक्त पदी ललित तळेकर )

‘या’ गोष्टी मुलांना नक्की शिकवाव्यात

मनाचे श्लोक यामध्ये संपूर्ण आयुष्य जगण्याची कला आहे. त्यामुळे या श्लोकाचा मुलांना फायदा होतो. योग केल्याने मुले तणावमुक्त होतात. त्यातही सुर्यनमस्कार महत्त्वाचा. त्यामुळे मुलांना योगासने शिकवावीत. तसेच, मुलांना कथा सांगणे गरजेचे असते. त्याने मुलं जगण्याची कला शिकतात. त्या गोष्टींमधून धडा घेतात, असे मंजिरी फडणीस पुढे म्हणाल्या.

याबरोबरच मुलांना सकस आहार मिळणेही गरजेचे आहे. खेळ हा मुलांच्या आयुष्यात महत्त्वाचा. खेळाच्या माध्यामातून मुले हरणे, जिंकणे शिकतात. त्यामुळे जीवनात पुढे येणा-या अडचणींचा ते योग्य प्रकारे सामना करु शकतात, याच सर्व गोष्टी पुस्तकात सविस्तर मांडल्याचे, फडणीस यावेळी म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.