फुटीरतावादी यासिन मलिक दोषी, NIA कोर्टाचा निकाल

86

काश्मिरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दहशवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. एनआयए न्यायालयाने गुरुवारी निकाल सुनावला आहे. यासिनच्या शिक्षेवर 25 मे रोजी न्याायालय निकाल सुनावणार आहे. यासिन मलिक याने याआधीच काश्मिरमधील दहशवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली होती.

या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

आधी झालेल्या सुनावणीमध्ये यासिन मलिकने दिल्लीतील एनआयए न्यायालयात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यानंतर न्यायालयाने 19 मेपर्यंत सुनावणी टाळली होती. मलिकने न्यायालयाला सांगितले की, त्याच्या विरोधात लावण्यात आलेल्या आरोपांना आव्हान देणार नसल्याचे म्हटले. यासिन मलिक विरोधात युएपीए कायद्यातील कलम 16, 17,18 आणि 20 आदी कलमांसह इतरही गुन्हे दाखल होते.

( हेही वाचा OBC Reservation: निवडणूक फाॅर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करु- अजित पवार)

जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते

जम्मू काश्मीरच्या लढ्याच्या नावाखाली यासिन मलिक याने जगभरातून बेकायदेशीर आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारला असल्याचे न्यायालयाने याआधी म्हटले होते. न्यायालयाने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता फारुख अहमद उर्फ बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसुफ शाह, आफताब अहमद शाह, नयीम खान, मोहम्मद अकबर खंडय, राजा मेहराजुद्दीन कलवाल,बशीर अहमद भट,झहूर अहमद शाह वातली, शबीर अहमद शाह, नवल किशोर कपूर आदींविरोधात आरोप निश्चित केले आहेत. यासिन मलिकवर लावण्यात आलेल्या आरोपांवरुन त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. यासिन मलिकला 25 मे रोजी एनआयए विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.