मुंबईसाठी पावसाचा यलो अलर्ट

105

मुंबईसह जवळच्या भागांत अतिवृष्टी तसेच मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या वेधशाळेला मंगळवारीही वरुणराजाने ठेंगा दाखवला. २१ जूनला पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पावसाच्या अंदाजात अचूकता गाठण्याच्या भीतीने आता ऑरेंज अलर्टऐवजी संपूर्ण आठवडा मुंबईसाठी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज देत यलो अलर्ट जारी केला आहे.

यलो अलर्ट जारी

हलक्या परंतु संततधार पावसामुळे वातावरणात गारवा जाणवला. सांताक्रूझमध्ये १३ मिमी तर कुलाब्यात ७ मिमी पावसाची नोंद झाली. सांताक्रूझमध्ये ३०.६ अंश सेल्सिअस तर कुलाब्यात २९ अंश सेल्सिअस कमाल तापमान वाढ दिसून आली. मंगळवारी सांताक्रूझमध्ये २९.३ तर कुलाब्यात २७.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहील, बहुतांश ठिकाणी हलक्या सरी कोसळतील. काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.