हवामान खात्याला अतिवृष्टीचा ठेंगा

94

मुंबईत सोमवारी दिला गेलेला अतिवृष्टीचा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचा इशारा खोटा ठरला आहे. दुपारी घामाच्या धारांमध्ये दिवस ढकलणा-या मुंबईकरांना पाऊस गेला कुठे, असा प्रश्न पडला होता. सायंकाळी साडेपाचच्या नोंदीत सांताक्रूझ येथे केवळ ३.३ मिमी तर कुलाब्यात १७.२ मिमी पावसाची नोंद झाली. अंधेरी, गोरेगाव, बोरिवली या भागांत अधूनमधून केवळ हलका पाऊस सुरु होता. मंगळवारी पालघर सोडून मुंबईसह संपूर्ण कोकणात अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने जारी केला आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या ताफ्यात दाखल होणार पहिली इलेक्ट्रिक AC डबल डेकर बस!)

पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले

दक्षिण कोकण ते उत्तर केरळदरम्यान हवेच्या वरच्या थरात कमी दाबाच्या आकारासदृश्य द्रोणीय स्थिती (इंग्रजी भाषेत ऑफ शोअर ट्रफ) निर्माण झाल्याने सध्या कोकण किनारपट्टीवर चांगल्या पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मंगळवारी अपेक्षेएवढाच पाऊस राहील, अशी आशा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या अधिका-यांनी व्यक्त केली.

सोमवारी सांताक्रूझ येथील आर्द्रता ९३ टक्के तर कुलाबा येथील आर्द्रता ९७ टक्के नोंदवली गेली. पालघर सोडून कोकणातील सर्व भागांत बुधवारपासून शनिवारपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.