Yoseph Macwan : हेल्पर म्हणून काम करणारा मुलगा झाला गुजराती साहित्यिक

178
Yoseph Macwan : हेल्पर म्हणून काम करणारा मुलगा झाला गुजराती साहित्यिक
Yoseph Macwan : हेल्पर म्हणून काम करणारा मुलगा झाला गुजराती साहित्यिक

योसेफ मॅकवान (Yoseph Macwan) यांचा जन्म २० डिसेंबर १९४० रोजी अहमदाबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव फिलिप आणि आईचे नाव मरियम होते. त्यांचे कुटुंब खरेतर नडियाद जवळील मलावाडा गावातील. लहानपणी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्यांना एसएससी पूर्ण केल्यानंतर अहमदाबाद म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट सेवेत हेल्पर म्हणून काम करावे लागले.

कोणास ठाऊक होते की हेल्पर म्हणून काम करणारा मुलगा भविष्यात गुजराती साहित्यातला तेजस्वी तारा ठरेल? त्यांना हेल्पर म्हणून कमी पगार मिळत होता. त्यामुळे त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला. त्यांनी १९६८ मध्ये गुजरात विद्यापीठातून गुजरातीमध्ये बी. ए केले आणि १९७० मध्ये एन.ए केले त्याचबरोबर १९७५ मध्ये बी.एड पूर्ण केले. वाईट परिस्थितीतही त्यांनी स्वतःच्या बळावर उच्च शिक्षण मिलवले.

(हेही वाचा-QR Code on Hording : राज्यातील प्रत्येक होर्डिंगवर क्युआर कोड लावा; उच्च न्यायालयाचे राज्यसरकारला आदेश )

१९६३ मध्ये ते अहमदाबादच्या शेठ चिमणलाल नगिनदास विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले आणि सेवानिवृत्ती घेईपर्यंत ते तिथे कार्यरत होते. या काळात त्यांनी तीन वर्षे वैशाखी द्वैमासिक चालवले. अरवता ही त्यांची पहिली रचना संस्कृती मासिकात प्रकाशित झाली होती.१९६९ मध्ये स्वागत हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्याचबरोबर पुढे सूरजनो हाथ, अलखना असावर आणि आवाजना एक्स-रे हे त्यांचे इतर काव्यसंग्रह प्रकाशित झाले.

त्यांची खरी ओळख गुजराती बालसाहित्यातील त्यांच्या योगदानामुळे आहे. डिंग डॉंग-डिंग डॉंग हा त्यांचा बाल काव्यसंग्रह असून ’वाह रे वार्ता वाह!’ हा त्यांचा बालकथासंग्रह आहे. त्याचबरोबर इतर अनेक साहित्यकृती त्यांनी निर्माण केली आहे. त्यांच्या स्वागत या पहिल्या काव्यसंग्रहाला गुजरात सरकारचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या बाल कवितांना गुजराती साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आणि त्यांच्या बालकथांना गुजराती साहित्य परिषदेने पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अहमदाबाद येथे २५ डिसेंबर २०२२ मध्ये त्यांचे निधन झाले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.