लुडो गेमच्या नादात आयुष्यभराची कमाई गेली, गुन्हे शाखेकडून एकाला अटक

166

स्मार्टफोनमधील ‘लुडो’ गेममध्ये हरलेल्या व्यक्तीला ६० लाख रुपयांची वसुली करण्यासाठी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकाला गुन्हे शाखा कक्ष ५ ने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीनेच तक्रारदारला दारूच्या नशेत बळजबरीने लुडो गेम खेळायला लावून ६० लाख रुपये हरल्याचे चित्र रंगवून वसुली सुरू केली होती अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.

( हेही वाचा : निरनिराळ्या परवानग्या एकाच मुख्य क्रमांकाखाली आणून प्रशासकीय कामांना मिळणार वेग )

वेलू चिल्ले मुरगम (४४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुरगम हा धारावीतील कुंभारवाड्यात राहत आहे. तक्रारदार क्लाडियस मुदलियार (३३) हा मर्चंट नेव्ही मध्ये कामाला आहे. धारावीतील धुरी टॉवर्समध्ये राहणाऱ्या क्लाडियसला मुशारफ खान याने उसने घेतलेले पैसे परत करतो असे सांगून सांताक्रूझ पूर्व कलिना येथील शास्त्री नगर या ठिकाणी ३ नोव्हेंबर रोजी बोलावून घेतले होते. त्या ठिकाणी वेलू मुरगम आणि त्याचे पाच सहकारी अगोदरच हजर होते. मुशर्रफ खान आणि इतर सहा जणांनी क्लाडियसला भरपूर दारू पाजून मोबाईल फोनमध्ये असलेला ‘लुडो गेम’ खेळण्यासाठी प्रवृत्त केले.

क्लाडियस हा लुडो गेममध्ये ६० लाख रुपये हरल्याचे सांगत त्याला पिस्तुलचा धाक दाखवून त्याच्या अंगावरील अंगावरील दागिने काढून घेतले,व त्यानंतर त्याला घरातून उर्वरित रक्कम आणण्यास सांगितले. आरोपीनी त्याला धमकी देऊन वेळोवेळी घरातील दागिने व रोख असे एकूण ६० लाख रुपये पिस्तुलचा धाक दाखवून बळजबरीने काढून घेतले होते. ३ ते ९ नोव्हेंबर २०२२ दरम्यान ही रक्कम वेळोवेळी काढून घेतल्यानंतर आपली फसवणूक करून आपली लूट करण्यात आल्याचे क्लाडियासच्या लक्षात आले. त्याने धारावी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली, धारावी पोलिसांनी याप्रकरणी अपहरण, डांबून ठेवणे, शस्त्राचा धाक दाखवणे, चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल करून वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला होता. गुन्हा अन्वेषण विभाग कक्ष ५ चे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर आणि अजित गोंधळी, सहायक पोलीस निरीक्षक अमोल माळी, सहायक फौजदार अंकुश न्यायनिर्गूने, भुजबळ, पोलीस हवालदार पैगणकर, विचारे, सरफरोज मुलाणी या पथकाने गुन्ह्याचा तपास करून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी वेलू मुरगम याला धारावी परिसरातून अटक करण्यात आली. अटक आरोपीचा ताबा पुढील तपासासाठी वाकोला पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.