तरुणांनी वीर सावरकरांचे विचार आचरणात आणावे! अविनाश धर्माधिकारी यांचे आवाहन

144

दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या नाशिक येथील ‘भगूर’ गावी सुद्धा नाशिकचे सहायक पोलिस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथींसह अनेक सावरकरप्रेमी उपस्थित होते.

जीवनातील एक अविस्मरणीय क्षण

हा माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने वीर सावरकरांच्या जन्मस्थळी राष्ट्रध्वज फडकवण्याचा जो मान दिला, हा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. जास्तीत जास्त तरूणांनी वीर सावरकरांचे विचार आचरणात आणावे असे आवाहन करत, वीर सावरकरांनी जसे देशकार्य केले अगदी त्याचप्रमाणे अलिकडच्या तरुणांनीही देशसेवा करावी, असे सांगत नाशिकचे सहायक पोलिस आयुक्त व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अविनाश धर्माधिकारी यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले.

( हेही वाचा : देश ८०० वर्षांच्या गुलामगिरीतून बाहेर पडलाय, स्वातंत्र्य टिकवण्याचा निर्धार करा! रणजित सावरकर यांचे आवाहन )

यापुढे सावरकरद्वेष्ट्यांना कायदेशीर धडा शिकवणार…

वीर सावरकर यांचा सावरकरद्वेष्टे कायम अवमान करत असतात. त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले जातात. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने याविरोधात कडक धोरण स्वीकारले आहे. अशा सावरकरद्वेष्ट्यांना कायदेशीररित्या धडा शिकवण्यासाठी विधी विभागाची स्थापना करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित या विभागाची घोषणा करण्यात आली. या विभागाचे प्रमुख अॅड. सुबोध पाठक हे असणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.