पिंपरीत गोळीबाराचा थरार! सराईत गुन्हेगाराचा गोळ्या घालून खून

120

पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे गुरव येथे शनिवारी सकाळी सराईत गुन्हेगाराचा पिस्तूलातुन गोळ्या घालून खून करण्यात आला. मारेकऱ्यांनी चार गोळ्या झाडल्या, यातील दोन जण गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार टोळी युद्धातून घडला असण्याची चर्चा आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद

योगेश जगताप असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. मरेकऱ्यांचा अद्याप तपास लागलेला नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार; पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात पिंपळे गुरव येथे हा प्रकार घडला. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याचा अंदाज सांगवी पोलिसांनी व्यक्त केला आहे.

( हेही वाचा-  ‘सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसह चारही नगरपंचायतीमध्ये सत्ता भाजपाचीच’)

आरोपींचा शोध सुरू

योगेश जगताप याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आज दत्त जयंतीनिमित्त जगताप याने काटे पुरम चौकात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरम्यान सकाळच्या वेळी मारेकऱ्यांनी येऊन पिस्तुलातुन गोळ्या झाडल्या. यामध्ये जगताप गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.