सावधान! अशा वेबसाइट्स आणि यूट्यूब चॅनलवर सरकारची नजर

125

भारतविरोधी प्रचार आणि खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल 20 यूट्यूब चॅनेल आणि दोन वेबसाइट्स ब्लॉक केल्याच्या काही दिवसांनंतर, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी इशारा दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, सरकार देशाविरूद्ध षड्यंत्र रचणाऱ्यांविरुद्ध आणि आफवा पसवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल आणि यापुढे देखील अशा प्रकारची कारवाई सुरूच राहील.

20 यूट्यूब चॅनेल, दोन वेबसाइट्सवर बंदी

अफवा पसरवणाऱ्या आणि देशाविरुद्ध कट रचणाऱ्या वेबसाइट्स आणि यूट्यूब चॅनेलवर बंदी घालणार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने भारताविरुद्ध खोटी माहिती आणि कट रचल्याबद्दल 20 यूट्यूब चॅनेल आणि दोन वेबसाइट्सवर बंदी घातली होती. केंद्र सरकार अशा वेबसाइट्स आणि यूट्यूब चॅनल्सवर कारवाई करत राहील, असा इशारा अनुराग ठाकूर यांनी दिला. अनुराग ठाकूर म्हणाले, “मी खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाइट्स आणि यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मला आनंद आहे की जगभरातील प्रमुख देशांनी याची दखल घेतली आहे. यूट्यूबने अशा यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत.

(हेही वाचा –चिनी सैन्याकडून 17 वर्षीय भारतीय मुलाचं अपहरण, सुटकेसाठी प्रयत्न सुरू)

समाजात फूट पाडणाऱ्यांवर कारवाई होणार

डिसेंबर 2021 मध्ये, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गुप्तचर संस्थांच्या सहकार्याने भारतविरोधी आणि खोटी माहिती पसरवल्याबद्दल 20 यूट्यूब चॅनेल आणि दोन वेबसाइट्सवर बंदी घातली. अनुराग ठाकूर म्हणाले की, समाजात फूट पाडणाऱ्या वेबसाइट्स आणि यूट्यूब चॅनल्सवर कारवाई सुरूच राहणार आहे. डिसेंबरच्या कारवाईनंतर अनुराग ठाकूर म्हणाले होते, “पाकिस्तानमधून बंदी घातलेले यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट्स चालवल्या जात होत्या. ते भारताशी संबंधित संवेदनशील विषयांवर खोट्या बातम्या पसरवत होते. या वेबसाइट्स आणि यूट्यूब चॅनेल काश्मीर, भारतीय लष्कर, भारतीय अल्पसंख्याक, राम मंदिर, जनरल बिपिन रावत इत्यादींवर चिथावणीखोर गोष्टी पसरवत होत्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.