Yuri Gagarin : अंतराळात जाणारे पहिले मानव युरी गागारिन

Yuri Gagarin : २ एप्रिलला गागारिन यांनी पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण केली, त्यांच्या उड्डाणाला १०८ मिनिटे लागली. अंतराळाच्या बाबतीत सोव्हिएत युनियनसाठी हे मोठे यश होते.

271
Yuri Gagarin : अंतराळात जाणारे पहिले मानव युरी गागारिन
Yuri Gagarin : अंतराळात जाणारे पहिले मानव युरी गागारिन

युरी गागारिन (Yuri Gagarin) हे सोव्हिएत युनियनचे (Soviet Union) विमानचालक आणि अंतराळवीर होते. विशेष म्हणजे १२ एप्रिल १९६१ रोजी अंतराळात जाणारे ते पहिले मानव होते. १२ एप्रिलला गागारिन यांनी पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण केली, त्यांच्या उड्डाणाला १०८ मिनिटे लागली. अंतराळाच्या बाबतीत सोव्हिएत युनियनसाठी हे मोठे यश होते.

’हीरो ऑफ दि सोव्हिएत युनियन’

या कर्तृत्वामुळे युरी खूपच प्रसिद्ध झाले आणि त्यांना अनेक पदके व पुरस्कार मिळाले. ’हीरो ऑफ दि सोव्हिएत युनियन’ हा किताबही मिळाला. गागारिन यांचा जन्म ९ मार्च १९३४ रोजी रशियन सोव्हिएत फेडरेटिव्ह सोशालिस्ट रिपब्लिकच्या क्लुशिनो गावात झाला. त्यांचे वडील सुतार होते आणि आई डेअरी चालवायची.

दुसर्‍या महायुद्धात झालेला छळ

दुसर्‍या महायुद्धात जर्मनीने देशाचा ताबा घेतल्यामुळे लाखो सोव्हिएत नागरिकांप्रमाणे, त्यांच्या कुटुंबाला देखील त्रास सहन करावा लागला. नाझींनी १८ ऑक्टोबर १९४१ रोजी क्लुशिनो ताब्यात घेतले. गावात त्यांच्या पहिल्याच दिवशी त्यांनी शाळा जाळून टाकली, घरे जाळली आणि नाझी सैनिकांसाठी त्यांना शेतात काम करायला राबवलं. ज्यांनी नकार दिला, त्यांना एकतर मारहाण झाली किंवा छळछावणीत पाठवण्यात आले.

युरी यांचे बालपण गरीबीत गेले. आर्थिक अडचणींमुळे लहान वयातच त्यांना ओतकामाच्या कारखान्यात काम करावे लागले. पुढे त्यांनी विमानाच्या कारखान्यात नोकरी केली. चांगल्या कामामुळे त्यांना विमानदलात घेण्यात आले आणि पुढे जाऊन अंतराळवीर होण्याचे प्रशिक्षण घेतले आणि त्यांनी चमत्कार करुन दाखवला. १९६८ मध्ये, मिग-१५ प्रशिक्षण विमानाचे संचालन करत असताना विमान कोसळल्याने त्यांचा वयाच्या अवघ्या ३४ व्या मृत्यू झाला. त्यांच्या सन्मानार्थ युरी गागारिन (Yuri Gagarin) पदक प्रदान केले जाते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.