‘झवेरी बझार वेलफेअर असोसिएशन’च्या वतीने पोलिस दलातील कोविड योद्ध्यांचा सन्मान

159

कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीच्या आपत्तीमुळे सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी निर्माण झालेल्या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी पोलिस दलातील सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी अथक प्रयत्न केले. समाजातील कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच जनमानसात सुरक्षा व सामाजिक बांधिलकी कायम ठेवण्याकरिता अविरतपणे झटून स्वत:च्या आरोग्याची जोखीम उचलली. रात्रीचा दिवस करत आपले कर्तव्य पार पाडले. अशा पोलिसांचा ‘झवेरी बझार वेलफेअर असोसिएशन’च्या वतीने सन्मान करण्यात आला.

विश्वास नांगरे-पाटील यांचा सत्कार

पोलिस दलातील ‘कोविड योद्ध्यांचा’ सत्कार करुन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांचा सत्कार सुर्वणकार समन्वय समिती अध्यक्ष राजाराम देशमुख व इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी केला. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात कोविड योद्ध्यांची भूमिका उपयुक्त ठरली होती. त्यामध्येही पोलिसांची भूमिका कौतुकास्पद होती. त्यामुळे पोलिसांचे कौतुक करण्यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांचा सत्कार समस्त पोलिस विभागाच्या प्रातिनिधीक म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.

(हेही वाचा वाजपेयींच्या पुतळ्याच्या अनावरणात महाविकास आघाडीचा खोडा!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.