ऋजुता लुकतुके
झी एंटरटेनमेंट आणि सोनी नेटवर्क (Zee – Sony Merger ) इंडिया यांनी गेल्यावर्षी दोन्ही वाहिन्यांच्या विलिनीकरणाची घोषणा केली खरी. आणि विलिनीकरणासाठी २१ डिसेंबर २०२३ ही तारीखही निर्धारित केली होती. पण, ही तारीख पाळली जाईल का अशी शंका मीडियात व्यक्त केली जात असतानाच झी एंटरटेनमेंटने आता अधिकृतपणे सोनी नेटवर्कला पत्र पाठवून मुदतवाढीची विनंती केली आहे.
झी एंटरटेनमेंट, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि बांगला एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड अशा तीन कंपन्यांमध्ये हे विलिनीकरण होणार आहे. पण, रविवारी झी कंपनीकडून (Zee – Sony Merger) शेअर बाजारात मुदतवाढ मागितल्याचा अर्ज दाखल झाला आहे.
(हेही वाचा-Ind vs SA 1st ODI : दक्षिण आफ्रिकेत यजमानांविरुद्ध ‘ही’ कामगिरी करणार अर्शदीप पहिला भारतीय गोलंदाज )
डिसेंबर २०२१ मध्ये सोनी आणि झी यांनी विलिनीकरणाला संमती दिली होती. विलिनीकरणानंतर तयार झालेली कंपनी ही भारतातील सगळ्यात मोठी मनोरंजन कंपनी असेल. बाकी सर्व प्रक्रिया नियमित पार पडली असताना, नवीन तयार झालेल्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष कोण होणार यावरून दोन्ही कंपनीत वाद सुरू झाले.
झी कंपनीला (Zee – Sony Merger ) त्यांचे कार्यकारी अधिकारी या पदावर हवे होते. पण, त्यांच्या दोन अधिकाऱ्यांना नवीन कंपनीच्या संचालक मंडळावरच निवडून येता आलं नाही. त्यासाठी लागणारी मतं त्यांना मिळाली नाहीत. झी चे संस्थापक सुभाषचंद्र गोयल यांचा मुलगा पुनित गोयल नवीन कंपनीचा प्रमुख असावा असं झीचं म्हणणं आहे. डिसेंबर २०२१ च्या करारातही तसं म्हटलं आहे. पण, सध्या सोनीचा या नेमणुकीला विरोध आहे. त्यातच गोयल यांच्या बाजूने असलेले दोन अधिकारी संचानक मंडळावर निवडून येऊ शकले नाहीत. त्यामुळे विलिनीकरणाच्या प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला होता.
आता ही अनिश्चितता आणखी वाढली आहे. झी आणि सोनीच्या विलिनीकरणानंतर १० अब्ज बाजारमूल्याची नवीन मनोरंजन कंपनी अस्त्वित्वात येणार आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community