सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या आज बरीच कमी झाली. सोमवारी, १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार ४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५५ हजार ४६५ झाली आहे. आज ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार २७२ झाली आहे. तर, कोकणातील पाच तालुक्यात आज एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही त्यामुळे आता पर्यटकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
कोकणातील चाकरमानी वर्ग नोकरी, उद्योगधंद्यानिमित्त मुंबईत स्थलांतरीत झाला आहे. यामुळेच कोकणातील लोकसंख्या कमी झाली आहे. शिवाय निसर्गरम्य ठिकाणे, लांब लांब असणारी घरे, आजूबाजूचा मोकळा परिसर यामुळे कोकण हळूहळू कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
( हेही वाचा : ‘मिस इंडिया’ होण्याचे तुमचे स्वप्न ‘असे’ करा साकार! )
रुग्णसंख्या कमी
जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या आज तीनशेच्याही खाली गेली असून ती आता २८७ झाली आहे. सर्वात जास्त ७० रुग्ण कुडाळ तालुक्यात आहेत. त्या खालोखाल मालवण तालुक्यात ६१ रुग्ण सक्रिय आहेत. वेंगुर्ले, कणकवली, सावंतवाडी, देवगड तालुक्यात सुद्धा आता रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे. आज दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ तालुक्यात प्रत्येकी फक्त एक रुग्ण आढळून आला तर देवगड, कणकवली, सावंतवाडी, मालवण आणि वैभववाडी कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३ रुग्ण ऑक्सिजनवर असून यापैकी एक रुग्ण चिंताजनक आहे. कोविड-१९ मुळे कोणाचाही मृत्यू नाही. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजार ५२० वर स्थिर आहे. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या एका आगारातील सर्व कर्मचाऱ्यांची केली बदली? काय आहे कारण… )
पाच तालुके कोरोनामुक्त
देवगड, कणकवली, सावंतवाडी, मालवण आणि वैभववाडी हे पाच तालुके कोरोनामुक्त झाल्याची माहितीही पाटील यांनी दिली आहे. यामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
Join Our WhatsApp Community