आता Zoom वर मेल, कॅलेंडरही पाहता येणार

158

कोरोनामध्ये मिटींग घेण्यास सर्वात सुलभ ठरलेल्या झूमने आता आणखी नवीन फीचर्स सादर केली आहेत. झूमच्या वापरकर्त्यांना लवकरच मिटींगमध्येही मेल आणि कॅलेंडर पाहता येणार आहे. याबाबतची घोषणा झूम ने त्यांच्या वार्षिक झूमटोपिया इव्हेंटमध्ये केली आहे.

झूम ने यंदाच्या वर्षात 1 हजार 500 हून अधिक वैशिष्ट्ये आणि सुधारणा केल्याचा दावा केला आहे. झूमचा स्वत:चा मेल आणि कॅलेंडरच्या फिचर्समुळे वापरकर्त्यांना झूमवर अधिक काम करणे शक्य होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. झूमचे मेल आणि कॅलेंडर अॅप्स वापरण्यासाठी झूम वापरकर्त्यांना त्यांचे ई-मेल तपासण्यासाठी झूम प्लॅटफाॅर्म सोडण्याची गरज नाही. ही सेवा सध्या बीटामध्ये तसेच अमेरिका आणि कॅनडामध्ये उपलब्ध आहे. झूम मेलसाठी ई-मेलमध्ये एंड टू एंड एन्क्रिप्शन असेल. झूम कॅलेंडर दरम्यान अॅपमध्ये झूम व्हाॅइस आणि व्हिडीओ काॅल शेड्यूल करण्यास परवानगी देईल, असे कंपनीने सांगितले.

( हेही वाचा: ‘आधार कार्ड’ संंबंधी सरकारने केला ‘हा’ नवा नियम )

झूम स्पाॅट्स काय आहे?

  • 2023 मध्ये येणारी झूम स्पाॅट्स ही एक व्हर्च्युअल को-वर्किंग स्पेस आहे, जी अधिक वैयक्तिक काम करण्यासाठी तयार केली आहे.
  • सध्या यातील बरेच तपशील कंपनीने सादर केले नसले तरीही हे स्पष्ट आहे की, वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या लोकांमधील अंतर कमी करणे हे कंपनीचे लक्ष्य आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.