सागरी किनाऱ्यावरील होणारे प्रदुषण रोखण्याचे आणि समुद्री जीवन वाचवण्याच्या उद्देशाने सेक्रेड हार्ट स्कूल, वरप कल्याण शाळेतील १० विद्यार्थ्यानी भारत ते श्रीलंका हे ३० किमी अंतर अवघ्या ११ तास ५५ मिनिटांत पोहून पूर्ण केले. 13 एप्रिल 2024 रोजी रात्री 00.05 वाजता किर्र अंधारात या विद्यार्थ्यांनी श्रीलंकेच्या तलाईमांनार येथून भारताकडे रामेश्वरम् च्या दिशेने पाण्यात झेप (Swimmer) घेतली. अंधाऱ्या काळोखात खवळलेला समुद्र, उंच लाटा, सोसाट्याच्या वारा या साऱ्यांची पर्वा न करता, रामचंद्र दशरथ म्हात्रे स्विमिंग कोच यांच्या मार्गदर्शनखाली या दहा विद्यार्थ्यांनी समुद्रात झेप घेतली. या मोहिमेत सहा मुले आणि चार मुलींचा सहभाग असून, साधारण एक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ही मोहीम फत्ते झाली.
अडीच ते तीन तास वादळी वारा
मीना वन आणि मिरॅकल या दोन बोटी या मोहिमेत सामील झाल्या होत्या. तर मोहिमेच्या सुरुवातीलाच निसर्गाने परीक्षा घेतली, अचानक समुद्री वादळ, वारा, साधारण पंचवीस फूट उंच लाटा असा खवळलेला समुद्र पाहून मोहिमेचे कसे होणार हा प्रश्न कोच आणि बोटितील सर्वांना पडला होता, पण साधारण अडीच ते तीन तास चालू असलेले वादळ वारा अचानक शांत झाला आणि सागरात संपूर्ण शांतता पसरली, मोहिमेला सुरुवात झाली होती. सर्वच वेळेचे बंधन पाळत लाटांवर स्वार होऊन भारताच्या दिशेने झेपावले (Swimmer) होते. वेळोवेळी मोहीमवीरांना प्रोत्साहन देण्याकरिता कोच रामचंद्र म्हात्रे रात्रभर मिरॅकल बोटीतून प्रोत्साहन देत होते, तर बोटीवरील चालक अंधार असल्याने हॅलोजनच्या प्रकाशात मोहीम वीरांना मार्ग दाखवण्याचे काम करत होते.
मोहीम फत्ते करून भारत भूमीवर नतमस्तक
जस जसे अंतर कापले जात (Swimmer) होते, तसे मोहीमवीरांचा जोश वाढत होता, पहाट झाली तेव्हा खोल सागराच्या कुशीत, लाटांच्या तडाख्यात तांबड फुटलं होतं. आता रामेश्वर किनाऱ्यावरील लाईट हाऊस दिसत होता. सागरी किनाऱ्याची गस्त घालत असलेले, भारतीय कोस्ट गार्ड सुरक्षेसाठी लक्ष ठेवून होते. साधारण 11 तास 55 मिनिटे पोहून ही मोहीम वेळेत पूर्ण करण्यात आली. सर्व वीर मोहीम फत्ते करून भारत भूमीवर नतमस्तक झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकार करत विजयोत्सव साजरा केला.
या मोहिमेसाठी सिक्रेड हार्ट स्कूलचे संचालक अल्बिन अँथोनी आणि मुख्याध्यापिका वनिता राज यांनी मोलाचे सहकार्य केले, तर स्पोर्ट्स इन्चार्ज विश्वास गायकर यांनी मोहिमेचे नियोजन केले. काशिनाथ मोहापे यांनी मोहीमवीरांना सहकार्य केले. या मोहिमेत रामचंद्र दशरथ म्हात्रे हे स्विमिंग कोच होते.
मोहीम वीरांची नावे
- 1. सक्षम रामचंद्र म्हात्रे
- 2. रोनित मनोहर म्हात्रे
- 3. निनाद अरविंद पाटील
- 4. समृद्धी विक्रम शेट्टी
- 5. तृप्ती अनुराग गुप्ता
- 6. श्रीरंग देवेंद्र साळुंखे
- 7. त्रिशा विनेश शेट्टी
- 8. सिद्धेश सुधीर पात्रा,
- 9. अभिप्रीत प्रशांत विचारे
- 10. अमोदिनी संदीप तोडकर
Join Our WhatsApp Community