इंडोनेशियात एका फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. यावेळी दोन क्लबचे समर्थक एकमेकांच्या आमने-सामने आलेत. यानंतर झालेल्या हिंसाचारात तब्बल १२९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. दोन्ही क्लबचे समर्थक माघार घेत नसल्याने पोलिसांकडून मैदानात लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी तब्बल १२९ हून अधिक जणांचा बळी तर कित्येक जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – ‘बेस्ट’ म्हणतेय…मुंबईत रिक्षा-टॅक्सी प्रवास महागल्यावर बस ‘BEST’ आहे!)
अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाया यांच्यात झालेल्या फुटबॉल सामन्यात अरेमाचा संघ पराभूत झाला. यानंतर त्यांच्या हताश समर्थकांनी मैदानावर गोंधळ घातला. स्टेडिअममधील चेंगराचेंगरी रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
NEW – Over 100 people were killed tonight in riots that broke out at a football match in Indonesia.pic.twitter.com/hGZEwQyHmL
— Disclose.tv (@disclosetv) October 1, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, जावाच्या मलंग रीजन्सी येथे झालेल्या सामन्यात अरेमाचा 3-2 असा पराभव केल्यानंतर जावानीज क्लब अरेमा आणि पर्सेबाया सुराबाया यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष झाला. मलंग रीजेंसी हेल्थ ऑफिसचे प्रमुख व्हिएन्तो विजयो यांनी सांगितले की, 129 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की अधिकारी अद्याप जखमींची संख्या पुढे येत आहे. या हिंसाचारात दोन पोलीस अधिकार्यांसह 129 जणांचा मृत्यू झाल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
Join Our WhatsApp Community