आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील खेळाडूंचा दणदणीत विजय झाला आहे. दिल्ली येथे २ ते ६ नोव्हेंबर २०२२ दरम्यान दुसरी इंडियन ओपन आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत ६ देश व ८०० हून अधिक खेळाडूंना सहभाग घेतला होता. वसई तालुक्यातील १४ खेळाडूंनी यात सहभाग घेऊन चमकदार कामगिरी केली.
( हेही वाचा : क्रिकेट बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ‘या’ खेळाडूवर कारवाई; १ वर्ष निलंबन, भरावा लागणार लाखोंचा दंड)
आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत यश
पालघर जिल्ह्यातून १४ मुलामुलींनी वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात म्हणजेच म्युझिकल फॉर्म, क्रिएटीव्ह फॉर्म, पॉईट फाईट, लाईट कॉन्टैक्ट, किकलाईट, अशा सर्व प्रकारात पालघर जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवण्यासाठी वसई विरार भागातील एकूण १४ मुलामुलींनी सहभाग घेतला होता.
बेस्ट कर्मचाऱ्याच्या मुलाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवले मोठे यश
यामध्ये बेस्ट कामगार असलेले दीपक महाजन यांच्या मुलाने सुवर्ण व रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. पाॅईंट फाईट या खेळात अक्षयला गोल्ड मेडल मिळाले आहे. तर वाको इंडियन ऒपन इंटरनॅशनल किकबाॅक्सिंग टूर्नामेंट 2022 मध्ये त्याला रौप्य पदक मिळाले आहे.
या विजयी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे आहेत…
- शौर्य मुडांपाट – २ सुवर्ण, १ कास्य
- जिज्ञा राऊत १- २ सुवर्ण
- प्रिती पाटील – २ सुवर्ण, १ कास्य
- डल परेरा – १ रौप्य, १ कास्य
- सोहम मच्छिवाल -२ सुवर्ण, १ कास्य
- वेदांत मच्छिवाल – २ रौप्य, १ कास्य
- अक्षय महाजन -१ सुवर्ण, १ रौप्य
- सागर भोईर – १ सुवर्ण, १ रौप्य
- क्लारा डिकोस्टा -१ सुवर्ण, १ रौप्य
- अक्षय वेरनेकर- १ सुवर्ण, १ रौप्य
- चैतन्य गौरीकर -१ सुवर्ण, १ रौप्य
- नेथन डिसोझा -१ सुवर्ण, १ कास्य
- प्रथम गांधी- २ सुवर्ण
- मिशेल डिसोजा- २ सुवर्ण
या मुलांना सूर्यप्रकाश मुडांपाट सर, अक्षय वेरनेकर, रिझवान मेमन, सागर भोईर, सायली कान्हात यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण मिळाले आहे. या स्पर्धेमध्ये सूर्यप्रकाश मुडांपाट हे पंच म्हणून उपस्थित होते. यांनी या स्पर्धकांच्या मागे मेहनत घेतली आहे. सर्व परीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. महाराष्ट्र किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शेलार यांचे मार्गदर्शन लाभले तसेच भारताचे कोच जयेश चोगले यांचे देखील मुलांना मार्गदर्शन मिळाले.
Join Our WhatsApp Community