Asia Cup 2022: आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर, या तारखेला होणार भारत-पाकिस्तान सामना

क्रिकेट क्षेत्रातील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणा-या आशिया कप 2022चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयकडून ट्वीट करत ही माहिती देण्यात आली आहे. 27 ऑगस्टपासून आशिया कप सुरू होणार असून 11 सप्टेंबर रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे भारताचा पहिलाच सामना हा पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत होणार आहे.

आशिया खंडातील अव्वल दर्जाच्या क्रिकेट संघांमध्ये आशिया कप खेळवण्यात येतो. यंदाच्या वर्षी भारत,पाकिस्तान,श्रीलंका,बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या पाच देशांमध्ये आशिया कपचा थरार रंगणार आहे. रविवार 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान हे पुन्हा एकदा एकमेकांशी भिडणार आहेत. त्यामुळे या सामन्याकडे भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेतील सर्व सामने हे युएईमध्ये खेळवले जाणार असून, दुबई आणि शारजाह येथे हे सामने होणार आहेत. 11 सप्टेंबर रोजी या स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे.

असे आहे वेळापत्रक

 1.  27 ऑगस्ट अफगाणिस्तान वि. श्रीलंका B दुबई
 2. 28 ऑगस्ट भारत वि.पाकिस्तान A दुबई
 3. 30 ऑगस्ट बांग्लादेश वि. अफगाणिस्तान B शारजाह
 4. 31 ऑगस्ट भारत वि. पात्र संघ A दुबई
 5. 1 सप्टेंबर श्रीलंका वि. बांग्लादेश B दुबई
 6. 2 सप्टेंबर पाकिस्तान वि. पात्र संघ A शारजाह
 7. 3 सप्टेंबर ग्रुप B पात्र 1 वि. ग्रुप B पात्र 2 सुपर 4 शारजाह
 8. 4 सप्टेंबर ग्रुप A पात्र 1 वि. ग्रुप A पात्र 2 सुपर 4 दुबई
 9. 6 सप्टेंबर ग्रुप A पात्र 1 वि. ग्रुप B पात्र 1 सुपर 4 दुबई
 10. 7 सप्टेंबर ग्रुप A पात्र 2 वि. ग्रुप B पात्र 2 सुपर 4 दुबई
 11. 8 सप्टेंबर ग्रुप A पात्र 1 वि. ग्रुप B पात्र 2 सुपर 4 दुबई
 12. 9 सप्टेंबर ग्रुप B पात्र 1 वि. ग्रुप A पात्र 2 सुपर 4 दुबई
 13. 11 सप्टेंबर सुपर 4 पात्र 1 वि. सुपर 4 पात्र 2 अंतिम सामना दुबई

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here