१९ वर्षीय गोल्फपटूची सामाजिक बांधिलकी! अशी करणार मदत

क्रूशिलने यापूर्वीही अशीच सामाजिक बांधिलकी जपत मदत कार्यासाठी पुढाकार घेतला आहे.

98

महाराष्ट्रात सध्या उद्भवलेली कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. समाजातील सर्व स्तरांतून कोरोना विरुद्ध लढाईत प्रत्येकजण आपापले योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. तरुण पिढीही यामध्ये मागे नाही, रक्तदान शिबिर असो वा अन्य उपक्रमांच्या माध्यमातून तरुण वर्ग पुढे सरसावून सामाजिक बांधिलकी जपत आहे. मुंबईतील १९ वर्षीय गोल्फपटू क्रूशिल के. एल. तेकचंदाणी हे पण त्यातीलच एक नाव आहे.

क्रूशिल हा वयाच्या सातव्या वर्षापसून गोल्फ खेळत आहे. जगभरातील गोल्फ स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करत विजयी होणे हे त्याच्यासाठी नवीन नाही. मात्र यंदा खेळामुळे नव्हे तर आणखी एका महत्त्वाच्या कारणामुळे क्रूशिलचे नाव सध्या चर्चेत आले आहे.

अशी करणार मदत 

कोरोना काळात मदतीचा हात म्हणून नुकतेच क्रूशिलने स्पर्धांमध्ये जिंकलेल्या आपल्या कमाईची रक्कम, चेंबुरमधील बॉम्बे प्रेसडेंसी गोल्फ क्लबला दान केली आहे. गोल्फ फिल्डवरील कर्मचाऱ्यांच्या कोविड लसीकरण मोहिमेसाठी त्याने ही आर्थिक मदत देऊ केली आहे. क्रूशिलने यापूर्वीही अशीच सामाजिक बांधिलकी जपत मदत कार्यासाठी पुढाकार घेतला आहे. वयाच्या १८ वर्षापासून तो आपल्या वाढदिवशी रक्तदान मोहिमेत सहभाग घेऊन गरजूंना मदत करतो.

व्यक्त केले मत

“कोणत्याही खेळात त्या फिल्डवरील सपोर्ट स्टाफ कायमच महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यांना आपण खेळातील फ्रंटलाईन वर्कर्स म्हणू शकतो. अशा संकटाच्या काळात खेळाडू म्हणून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देणे हे माझे कर्तव्य आहे”, असे मत क्रूशिलने व्यक्त केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.