- ऋजुता लुकतुके
आयसीसी अंतर्गत खेळवल्या जाणाऱ्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची रचना बदलली जावी, अशी जोरदार चर्चा आता मूळ धरू लागली आहे. ९ कसोटी संघ कामगिरी, कौशल्य आणि क्षमतेनुसार, दोन स्तरांमध्ये विभागले जावेत आणि अव्वल स्तरातील संघांदरम्यान नियमितपणे कसोटी मालिका व्हाव्यात अशी ही संकल्पना आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेट टिकून राहील आणि खेळाला प्रेक्षक, प्रायोजकही मिळतील, असा जाणकारांचा अंदाज आहे. (2 Tier Test Championship ?)
नुकत्या पार पडलेल्या बोर्डर-गावस्कर मालिकेत प्रेक्षकांनी गर्दीचे सर्व विक्रम मोडले. ऐतिहासिक मेलबर्न मैदानावर तर जवळ जवळ ४ लाख प्रेक्षकांनी पाच दिवस मिळून गर्दी केली. यामुळे आनंदी झालेल्या या तीन मंडळांनी त्यासाठी बोलणी सुरू करायंच ठरवलं आहे. सध्या आयसीसीचे अध्यक्ष असलेले जय शाह, इंग्लिश बोर्डाचे अध्यक्ष रिचर्ड थॉमसन आणि ऑस्ट्रेलियन मंडळाचे अध्यक्ष माईक बर्ड जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात यासाठी एक बैठकही एकत्रपणे घेणार आहेत. (2 Tier Test Championship ?)
(हेही वाचा – Union Budget मध्ये दिल्लीसाठी केलेल्या योजनांची घोषणा करता येणार नाही; कारण…)
सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वृत्तपत्राने या आशयाची बातमी दिली आहे. नुकत्याच संपलेल्या बोर्डर-गावस्कर मालिकेनंतर ही चर्चा सुरू झाली आहे. कारण, ॲशेस आणि बोर्डर-गावस्कर या मालिका कसोटीतील लोकप्रिय मालिका आहेत. आणि प्रेक्षकांचा त्यांना प्रतिसाद मिळतो. अगदी टीव्हीवरही या मालिकांना लोकांची पसंती असते. (2 Tier Test Championship ?)
ते पाहून द्विस्तरीय कसोटी मालिक व्हाव्यात असा प्रयत्न पुन्हा सुरू होणार आहे. २०२७ चा कसोटी अजिंक्यपद हंगाम संपला की, याची अंमलबजावणी होऊ शकते. जर अंमलबजावणी झाली तर भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे देश एकमेकांशी दर दोन वर्षांनी एकदा कसोटी मालिका खेळतील. एरवी अशा मालिका दर चार वर्षांनी येतात. (2 Tier Test Championship ?)
(हेही वाचा – Narendra Modi-Satya Nadella Meet : पंतप्रधान मोदी आणि सत्या नाडेला यांच्या भेटीत भारतात मायक्रोसॉफ्टच्या विस्तारावर चर्चा)
यापूर्वीही आयसीसीने २०१६ मध्ये तसा प्रस्ताव ठेवला होता. पण, तेव्हा भारतानेच त्याला विरोध केला होता. तेव्हाचे बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी लहान क्रिकेट मंडळांचा बचाव करण्याच्या हेतूने प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं होतं. कसोटीतील अननुभवी संघांना बलाढ्य देशांशी खेळण्याची संधी मिळणार नाही आणि त्यांच्या बलाढ्य देशांशी मालिका झाल्या नाहीत तर त्यांना महसूल मिळणार नाही, अशी भूमिका भारताबरोबरच इतर सहा देशांनीही घेतली होती. पण, आता जय शाह आयसीसी अध्यक्ष असताना तसा प्रयत्न पुन्हा होऊ शकतो. (2 Tier Test Championship ?)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community