- ऋजुता लुकतुके
सांघिक तिरंदाजी स्पर्धेतही तिघांमध्ये अव्वल ठरलेली भजन कौर (Bhajan Kaur) महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात अंतिम आठ जणांमध्ये पोहोचली आहे. दुसऱ्या बाद फेरीत भजनने पोलंडच्या वायोलता मायझरचा सलग ६ सेटमध्ये पराभव केला. त्यातही तिने कमावलेले गुण २८, २९ आणि २८ असे आश्वासक होते. त्यामुळे भजन कौरची सुरुवात एकदम दमदार झाली आहे. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- Paris Olympic 2024 : जाणून घेऊया भारतीय पथकाचं बुधवारचं वेळापत्रक काय आहे)
भजनच्या तडाख्यासमोर मायझरची कामगिरी फिकी होत गेली. कारण, मायझरने २३,२६ आणि २२ असे गुण कमावले. आधीच्या सामन्यातही भजनने इंडोनेशियाच्या साईफा कमालचा ७-३ असा पराभव केला होता. या लढतीची सुरुवात कमालच्या बाजूने झाली. तिने पहिला सेट २९ विरुद्ध २७ गुणांनी जिंकला. पण, त्यानंतर भजनला सूर गवसला. तिने पुढचे पाच सेट सलग जिंकून सामनाही जिंकला. (Paris Olympic 2024)
Women’s Individual Recurve 1/16 Elimination Round
Bhajan Kaur defeated her Polish🇵🇱 opponent Wioleta Myszor 6-0.
Let’s #cheer4Bharat altogether as #TeamIndia looks for glory at #ParisOlympics2024.
Her next match will be in the 1/8 Elimination Round on August 3.
Tune in to… pic.twitter.com/yJWdKrFJDu
— SAI Media (@Media_SAI) July 30, 2024
भजन (Bhajan Kaur) एकीकडे चांगली कामगिरी करत असताना, दुसरीकडे तरुण आणि होतकरू अंकिता भाकटचा मात्र पहिल्या बाद फेरीतच निभाव लागला नाही. वियोलेता मायझरनेच तिला आरामात हरवलं. खरंतर अंकिताने ४-२ अशी आघाडी घेत सुरुवात चांगली केली होती. विजयासाठी फक्त एका सेटची गरज असताना अंकिताचा खेळ ङसरला. दुसरीकडे मायझरने पुढील तीन सेट आपल्या नावावर करत सामनाही जिंकला. त्या पुढील सामन्यात भारताच्याच भजनकडून तिचा पराभव झाला. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- Missing girls : मागील ३ वर्षांत महाराष्ट्रातून १ लाख मुली बेपत्ता)
महिलांच्या तिरंदाजी स्पर्धेत गुरुवारी भजन आणि दीपिका भारतीय आव्हान पुढे घेऊन जातील. (Paris Olympic 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community