Washington Sundar : आयपीएलमध्ये ३ संघांनी वॉशिंग्टन सुंदरसाठी लावली फिल्डिंग

आयपीएलचा मेगा लिलाव नोव्हेंबरमध्ये होणार आहे.

47
Washington Sundar : आयपीएलमध्ये ३ संघांनी वॉशिंग्टन सुंदरसाठी लावली फिल्डिंग
Washington Sundar : आयपीएलमध्ये ३ संघांनी वॉशिंग्टन सुंदरसाठी लावली फिल्डिंग
  • ऋजुता लुकतुके

नुकत्याच झालेल्या पुणे कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाला. पण, ऑफ स्पिनर आणि अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आपल्या कामगिरीमुळे चमकला. ११५ धावांत त्याने ११ बळी घेतले. या कामगिरीनंतर मुंबई कसोटीत त्याचा संघातील समावेश तर नक्की आहेच. शिवाय पुढील महिन्यात २५ आणि २६ नोव्हेंबरला आयपीएलचा लिलाव होईल तेव्हा वॉशिंग्टन सुंदरवर (Washington Sundar) संघमालकांच्या उड्या पडतील हे निश्चित आहे.

सध्या तो सनरायझर्स हैद्राबादकडून खेळतो. पण, तो संघाने कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत सध्यातरी नाहीए. तरी ते आरएमटी कार्ड वापरून सुंदरला आपल्याकडे कायम ठेवू शकतात. आणि तसं झालं नाही तरी मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनै सुपरजायंट्स हे तीन संघ त्याला आपल्याकडे खेचण्यासाठी मोठी बोलू लावू शकतात.

(हेही वाचा – स्टार प्रचाराकांच्या यादीत Supriya Sule यांचा नंबर तिसरा, ताईंना मागे कुणी टाकले?)

वॉशिंग्टन यापूर्वी भारतीय संघाकडून कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० असं तीनही प्रकारात खेळला आहे. आणि यंदाचं त्याचं पुनरागमनही यशस्वी ठरलं आहे. सिवाय रणजीतील त्याची अलीकडची कामगिरीही अष्टपैलू आहे. त्यामुळे संघांना तो आपल्याकडे नक्कीच हवा आहे.

२०२४ चा आयपीएल हंगाम त्याच्यासाठी विसरण्यासारखाच गेला होता. त्याला हंगामात फक्त २ सामने खेळता आले. आणि यात त्याने पाच षटकांत ७३ धावा देताना फक्त एक बळी मिळवला. पण, त्यानंतर परिस्थिती बदलली आहे. महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघातून सुंदर यापूर्वी ५२ टी-२० सामने खेळलेला आहे. आणि यात त्याने २३ च्या सरासरीने ४६ बळीही मिळवले आहेत. तर एका अर्धशतकासह १३१ धावा केल्या आहेत.

२०१७ च्या आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळताना वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) पहिल्यांदा चमकला होता. आणि या हंगामात त्याने आपल्या गोलंदाजीची चमक दाखवून देताना पुणे संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं होतं. त्याची खडूस गोलंदाजी आणि जास्त धावा न देणारी शैली यामुळे तो लक्षात राहिला होता. 11 सामन्यांत ८ बळी मिळवताना त्याने ६.१३ गतीने धावा दिल्या होत्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.