३७व्या राष्ट्रीय स्पर्धांचा (37th national games) समारोप ९ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजता एसपीएम इनडोअर स्टेडियम, बांबोलीम येथे होणार आहे. त्यासाठी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड उपस्थित राहणार आहेत. याविषयाची माहिती क्रीडा मंत्री गोविंद गौडे यांनी दिली. २५ ऑक्टोबर २०२२ रोजी या स्पर्धांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्यात उदघाटन झाले होते. योगायोगाने, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरत येथे झालेल्या ३६व्या राष्ट्रीय खेळांच्या समारोप समारंभातसाठीही जगदीप धनकड हे प्रमुख पाहुणे होते.
या स्पर्धेत मल्लखांबसह ५ देशी खेळांसह ४३ क्रीडा प्रकारांचा खेळाच्या महाकुंभामध्ये समावेश केला होता. गोव्यातील म्हापसा, मडगाव, पणजीम, पोंडा आणि वास्को या पाच शहरांमध्ये राष्ट्रीय खेळ आयोजित करण्यात आले. बीच फुटबॉल, रोल बॉल, गोल्फ, सेपक टकराव, स्काय मार्शल आर्ट्स, कालिया रापट्टू आणि पेनकॅक सिलाट या क्रीडा प्रकारांचा ३७व्या राष्ट्रीय खेळांमध्ये (37th national games) समावेश करण्यात आला. या स्पर्धेत जिम्नॅस्टिक्स, रोइंग, हॉकी, बॉक्सिंग, नेमबाजी, वॉटर पोलो, लॉन टेनिस, स्नूकर, हँडबॉल, ज्युडो, टेबल टेनिस असे अनेक खेळ खेळले गेले.
महाराष्ट्राची अशी होती कामगिरी
३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत (37th national games) महाराष्ट्राने तिरंदाजी, योगासने, नौकानयन या क्रीडा प्रकारांत पदके मिळवत पदकांचा आकडा १९९पर्यंत उंचावला. पदकतालिकेत अग्रस्थानावर असलेल्या महाराष्ट्राच्या खात्यावर ६८ सुवर्ण, ६३ रौप्य, ६८ कांस्यपदकांसह एकूण १९९ पदके जमा झाली आहेत. सेनादल (५४ सुवर्ण, २३ रौप्य, ३२ कांस्य, एकूण १०९ पदके) दुसऱ्या आणि हरयाणा (५० सुवर्ण, ३७ रौप्य, ५३ कांस्य, एकूण १४० पदके) तिसऱ्या स्थानावर आहेत.
Join Our WhatsApp Community