43 Run Over : काऊंटी क्रिकेटमध्ये ‘या’ गोलंदाजाच्या एका षटकात निघाल्या ४३ धावा

43 Run Over : काऊंटी क्रिकेटच्या १३४ वर्षांच्या इतिहासात एका षटकात लुटलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. 

95
43 Run Over : काऊंटी क्रिकेटमध्ये ‘या’ गोलंदाजाच्या एका षटकात निघाल्या ४३ धावा
  • ऋजुता लुकतुके

ऑली रॉबिनसन हा एरवी इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय स्टार आहे. पण, गुरुवारी तो एका नकोशा विक्रमाचा धनी झाला. काऊंटी क्रिकेटमध्ये लिसेस्टरशायरच्या आठव्या क्रमांकाचा फलंदाज लुईस किंबरने त्याच्या गोलंदाजीवर थोड्या थोडक्या नाही तर ४३ धावा लुटल्या. हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नवीन विक्रम आहे. या कसोटी सामन्यात ससेक्स काऊंटी संघाने दुसरा डाव ६ बाद २९६ धावांवर घोषित केला. लुसेस्टरशायरसमोर विजयासाठी ४६४ धावांचं लक्ष्य ठेवलं. लिसेस्टरशायरची अवस्था तेव्हा ६ बाद १४४ होती आणि लुईस किंबर मैदानात उतरला. (43 Run Over)

आल्यापासूनच त्याने आक्रमक खेळ सुरू केला आणि म्हणता म्हणता तो अर्धशतकाच्या जवळ पोहोचला. या दरम्यान ५९ व्या षटकात त्याचा मुकाबला रॉबिनसनचा होता. या षटकात किंबरने २ षटकार आणि ६ चौकार ठोकले. याशिवाय रॉबिनसनने तीनवेळा नोबॉल टाकला. याच्या प्रत्येकी दोन धावा लिसेस्टरशायरला मिळाल्या. (43 Run Over)

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : पॅरिससाठी पात्र ठरलेले ५ मुष्टीयोद्धे सरावासाठी निघाले जर्मनीला)

या षटकानंतरही किंबरने आपला धडाका सुरूच ठेवला आणि शतक झळकावलं. काऊंटीच्या १३४ वर्षांच्या इतिहासात रॉबिनसनचं हे षटक सगळ्यात महागडं ठरलं. दोनच दिवसांपूर्वी शोएब बशिरच्या एका षटकांत ३८ धावा निघाल्या होत्या. आता या नवीन विक्रमामुळे शोएबला थोडं हायसं वाटलं असेल. कारण, नकोशा विक्रमापासून त्याची सुटका झाली आहे. किंबरने ९२ चेंडूंत १९१ धावा केल्या. पण, अखेर लिसेस्टरशायरचा संघ ४४५ धावांत बाद झाला. आणि ससेक्सला १८ धावांनी विजय मिळाला. (43 Run Over)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.