-
ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियात क्लब क्रिकेट स्तरावर एका तरुणाने ६ चेंडूंत ६ बळी टिपून संघाला झटपट सामना जिंकून दिला आहे. क्रिकेटच्या इतिहासातील हा एक विक्रम आहे. (6 Wickets in 6 Balls)
ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या श्रेणीच्या एका क्लब स्तरावरील सामन्यात एका गोलंदाजाने सामन्याच्या शेवटच्या षटकांत तब्बल सहा बळी टिपले आणि संघाला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. गॅरेथ मॉर्गन असं या गोलंदाजाचं नाव आहे. गोल्डकोस्ट प्रिमिअर लीग या स्पर्धेत मुदगिराबा क्लबकडून मॉर्गनने ही कामगिरी केली. (6 Wickets in 6 Balls)
विशेष म्हणजे तोपर्यंत मुदगिराबा क्लब या सामन्यात पिछाडीवर होता आणि पराभवाच्या वाटेवर होता. सर्फर्स पॅराडाईस या क्लबला विजयासाठी ५ धावा हव्या होत्या आणि त्यांचे सहा गडी शिल्लक होते. अशावेळी कर्णधार मॉर्गनने शेवटचं षटक स्वत: टाकण्याचं ठरवलं आणि त्यानंतर सामन्याला अनपेक्षित कलाटणी मिळाली. (6 Wickets in 6 Balls)
Gareth Morgan takes 6 wickets in an over…
In the final over defending 5 runs.In third division club cricket of Gold Coast in Australia.
Aled Carey also took 6 wickets in an over in Australian club cricket, in Jan 2017.
(📷: https://t.co/GTAMKrFBHO) pic.twitter.com/kFZkDqwXpo— Kausthub Gudipati (@kaustats) November 12, 2023
मॉर्गनने पहिल्याच चेंडूवर जम बसलेला सलामीवीर जेक गार्लंडला ६५ धावांवर बाद केलं आणि पुढील पाच चेंडूंवर त्याने पुढच्या सर्व फलंदाजांना शून्यातच पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. शेवटचं षटक सुरू झालं तेव्हा पंचांनी गमतीने मॉर्गनला, ‘आता तुला हॅट-ट्रीकच घ्यावी लागेल,’ असं म्हटलं होतं. (6 Wickets in 6 Balls)
आणि हे खरं ठरलं. एबीसी या वृत्तवाहिनीशी बोलताना मॉर्गनने अजूनही या कामगिरीवर विश्वास बसत नसल्याचं सांगितलं. ‘कर्णधार म्हणून मी स्वत:ला इतकंच बजावत होतो की, सामना आपल्याला गमावायचा नाही. पण, असं काहीतरी घडेल असं वाटलंच नव्हतं.’ असं काहीतरी घडलेलं कधी पाहिलंही नव्हतं असंच विजयानंतर मॉर्गन म्हणाला. (6 Wickets in 6 Balls)
(हेही वाचा – Dating App Scam : पुण्यातील एका तरुणाची २२,००० रुपयांना फसवणूक)
मॉर्गनने पहिल्या चार चेंडूंवर घेतलेले बळी हे झेलबाद होते आणि शेवटच्या दोन फलंदाजांना त्याने त्रिफळाचीत केलं. क्रिकेट खेळाला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. मॉर्गनच्या या कामगिरीचं वर्णन एबीसी वाहिनीने अशाच प्रकारे केलं आहे. (6 Wickets in 6 Balls)
कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटसाठी हा एक विक्रम आहे. एकाच षटकांत आतापर्यंत जास्तीत जास्त पाच बळी गोलंदाजांनी घेतले होते. २०११ मध्ये न्यूझीलंडच्या नील वॅग्नरने, २०१३ मध्ये बांगालदेशच्या अल आमिन हुसैनने तर २०१९ मध्ये भारताच्या अभिमन्यू मिथुनने अशी कामगिरी आतापर्यंत केली आहे. (6 Wickets in 6 Balls)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community