भारतीय संघाच्या अंडर 19 च्या माजी कर्णधारावर गुन्हा दाखल

141

भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाचा माजी कर्णधार (under 19 Indian Team formar Captain) आणि शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांचा जावई विजय झोल (VijayZol) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिप्टो करन्सीच्या (Crypto Currency) व्यवहारात उद्योजकाला गुंडाकरवी पिस्तूल दाखवून धमकल्याप्रकरणी जालन्यातील (Jalna) घनसांगी पोलीस स्टेशमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणावर विजय झोल याची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

विजय झोलवर नेमके आरोप काय?

क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून विजय झोल याने गुंतवणूक केली. त्यात या क्रिप्टो करन्सीचे मार्केट व्हॅल्यू घसरल्याने आपल्याला त्यात दोषी धरुन क्रिकेटर विजय झोल आणि त्याच्या भावाने घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदार किरण खरात यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी क्रिकेटर विजय झोल आणि त्याचा भाऊ विक्रम झोल याच्यासह 15 जणांवर घनसांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

( हेही वाचा: संजय राऊतांचे आरोप म्हणजे नापासाची मार्कशीट असलेल्यांनी अभ्यासाचे तत्वज्ञान सांगण्यासारखे; सुधीर मुनगंटीवारांचा टोला )

झोल कुटुंबावर काॅंग्रेस आमदाराचे गंभीर आरोप

या प्रकरणावरुन काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी खोतकर आणि झोल कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. कैलास गोरंट्याल यांनी सोमवारी पत्रकार परिषेदत घेऊन खोतकर आणि झोल यांच्यावर गुन्हा दाखल करा, मोक्का लावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे कैलास गोरट्यांल म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.