फुटबाॅलची जागतिक प्रशासकीय संस्था फिफा आणि आशियाई फुटबाॅल काॅन्फेडरेशन यांचे संयुक्त शिष्टमंडळ बुधवारी भारतीय फुटबाॅलच्या अनेक संबंधितांशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. दरम्यान, या भेटीनंतर या शिष्टमंडळाकडून भारतीय फुटबाॅल संघटनेवर बंदी घातली जाऊ शकते.
( हेही वाचा: ‘अग्निपथ’ योजनेचा सरन्यायाधीश करणार फैसला; आंदोलनाचा मुद्दा अखेर सर्वोच्च न्यायालयात )
प्रलंबित निवडणुका लवकर घेण्याचे निर्देश
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी एआयएफएफचा प्रफुल्ल पटेल अध्यक्ष असलेली कार्यकारिणी बरखास्त करताना, माजी न्यायमूर्ती ए.आर.दवे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकांची समिती स्थापन करताना, सुधारित संविधानानुसार प्रलंबित राष्ट्रीय फेडरेशनच्या निवडणुका लवकर घेण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर फिफा आणि एएफसीचे शिष्टमंडळ भारतीय फुटबाॅल भागधारकांची भेट घेणार असल्याने, एआयएफएफवर बंदी घातली जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत शिष्टमंडळ सुधारित घटनेचे पालन करण्याच्या स्थितीबद्दल आणि निवडणुका घेण्याच्या कालावधीबद्दल प्रशासकांशीही चर्चा करणार आहे.
Join Our WhatsApp Community