मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये उभारणार सचिन तेंडुलकरचा पुतळा

186

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने हा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष अमोल काळे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. येत्या वन डे वर्ल्ड कप दरम्यान भव्य सोहळ्यात पुतळ्याचे अनावरण पार पडेल. 14 नोव्हेंबर 2013 ला वानखेडे स्टेडिअमवरच सचिन तेंडुलकरने आपली अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. वानखेडे स्टेडिअमवर सध्या सचिन तेंडुलकरच्या नावाने एक प्रेक्षक गॅलरी आहे. मात्र, आता सचिनचा पुतळाही उभारला जाणार आहे.

( हेही वाचा: निवडणूक अयोग नव्हे चुना लगाओ अयोग – उद्धव ठाकरे )

काय म्हणाले अमोल काळे?

सचिव तेंडुलकर एक भारतरत्न आहे. त्याने क्रिकेटसाठी काय केले हे सर्वांना माहिती आहे. तो 50 वर्षांचा झाल्यावर ही MCA कडून कौतुकाची भेट असेल. मी तीन आठवड्यांपूर्वी त्यांच्याशी बोललो आणि त्यांची संमती घेतली.

एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम

सचिन तेंडुलकरने वयाच्या सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताकडून पदार्पण करणारा तो सर्वात लहान खेळाडू आहे. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 15 हजार 533 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरने भारतासाठी 200 कसोटी सामने, 463 एकदिवसीय आणि एक टी-20 सामना खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (100) आणि धावा ( 34 हजार 357) करण्याची विक्रम त्याच्या नावावर आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.