Abhimanyu Easwaran : बंगालच्या अभिमन्यू ईश्वरनची मनिषा लवकरात लवकर भारतीय जर्सी परिधान करण्याची

अभिमन्यू ईश्वरन देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. 

290
Abhimanyu Easwaran : बंगालच्या अभिमन्यू ईश्वरनची मनिषा लवकरात लवकर भारतीय जर्सी परिधान करण्याची
Abhimanyu Easwaran : बंगालच्या अभिमन्यू ईश्वरनची मनिषा लवकरात लवकर भारतीय जर्सी परिधान करण्याची
  • ऋजुता लुकतुके

अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. (Abhimanyu Easwaran)

दक्षिण आफ्रिकेसाठी भारतीय संघाची निवड गेल्या आठवड्यात झाली तेव्हा एका नावाची जोरदार चर्चा निवड समितीच्या बैठकीत झाली. तीनही प्रकारच्या संघात अखेर त्या खेळाडूची वर्णी लागली नाहीच. पण, निवडीपासून तो खूप लांबही नव्हता. या खेळाडूचं नाव आहे बंगालचा अभिमन्यू ईश्वरन. (Abhimanyu Easwaran)

देशांतर्गत क्रिकेटमध्ये ८८ प्रथमश्रेणी सामन्यांत मिळून त्याने ६,५०० च्या वर धावा जमवल्या आहेत. गेल्यावर्षी कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी तो स्टँडबाय खेळाडू होता. पण, मुख्य संघात काही त्याला स्थान मिळालं नाही. आफ्रिकेत जायची संधी हुकल्यामुळे अभिमन्यू नाराज नक्कीच आहे. पण, ‘ती वेळ लवकरच येईल,’ अशी आशाही त्याला (Abhimanyu Easwaran) आहे. (Abhimanyu Easwaran)

भारतीय राष्ट्रीय संघात स्थान मिळवणं हेच त्याचं अंतिम ध्येय असल्याचं तो (Abhimanyu Easwaran) निक्षून सांगतो. (Abhimanyu Easwaran)

‘मीडिया किंवा लोक माझा उल्लेख भारतीय क्रिकेटपटू असा करतात, तेव्हा मी विचार करतो की, अजून भारताकडून खेळायला मला मिळालेलं नाही. पण, लवकरच ते मिळेल, अशी मला आशा आहे. ते तर प्रत्येकाचंच स्वप्न असतं,’ अभिमन्यू मीडियाशी बोलताना म्हणाला. (Abhimanyu Easwaran)

(हेही वाचा – Nawab Malik : नवाब मलिक अजित पवार गटात येताच मोहित कंबोज यांचे ट्विट; म्हणाले…)

बंगालकडून खेळत असला तरी अभिमन्यू मूळचा डेहराडूनचा आहे आणि दक्षिण आफ्रिकेत भारतीय अ संघाकडून तो खेळणार असल्यामुळे दौऱ्यापूर्वी तो घरी आला आहे. अभिमन्यूच्या (Abhimanyu Easwaran) नावावर २२ प्रथमश्रेणी शतकं आहेत. विराट, रोहित यांच्या जमान्यात खेळणाऱ्या अभिमन्यूचा भारतीय संघासाठी आतापर्यंत विचार झाला नाही. किंवा तो काठावर राहिला. पण, त्याने आपलं स्वप्न सोडलेलं नाही. (Abhimanyu Easwaran)

‘भारतीय संघाकडून खेळणं हे माझं एकमेव स्वप्न आहे आणि ते मी इतक्यात सोडणार नाही. मी त्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणारच,’ असं तो पीटीआयशी बोलताना म्हणाला. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्यासाठी त्याने वेगळी मेहनत घेतली आहे. तर आगामी आयपीएलच्या लिलावावरही त्याचं लक्ष आहे. (Abhimanyu Easwaran)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.