- ऋजुता लुकतुके
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेनं भारतीय माजी खेळाडू अभिनव बिंद्राचा ऑलिम्पिक ऑर्डर देऊन सन्मान करण्याचं ठरवलं आहे. बिंद्राने ऑलिम्पिक चळवळीसाठी दिलेल्या योगदानासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ऑलिम्पिक सोहळ्याच्या समारोपाच्या एक दिवस आधी १० ऑगस्टला पॅरिसमध्येच हा पुरस्कार प्रदान सोहळा होईल. अभिनव बिंद्राला पत्राद्वारे हा निर्णय कळवण्यात आला आहे. (Abhinav Bindra)
‘आम्हाला हे कळवण्यास आनंद होत आहे की, तुमच्या ऑलिम्पिक चळवळीतीन योगदानासाठी ऑलिम्पिक परिषदेच्या कार्यकारी मंडळाने तुम्हाला ऑलिम्पिंक ऑर्डर प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असं अभिनवला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेकडून दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. ऑलिम्पिक खेळांत सर्वोत्तम कामगिरी बजावणारे खेळाडू, ऑलिम्पिक चळवळीत सिंहाचा वाटा उचलणारे कार्यकर्ते यांना हा पुरस्कार दिला जातो. ऑलिम्पिक परिषदांकडून या पुरस्कारासाठी नामांकनं मागवली जातात. अंतिम निर्णय हा कार्यकारी समितीचा असतो. (Abhinav Bindra)
Congratulations to @Abhinav_Bindra on being awarded the Olympic Order for outstanding contributions to the Olympic Movement!
His achievement fills us with pride and is truly well-deserved.
His name alone has inspired generations of shooters and Olympians. pic.twitter.com/w8i6Ykr09X
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) July 22, 2024
(हेही वाचा – Manoj Jarange यांच्याविरोधात अटक वॉरंट; काय आहे प्रकरण ?)
४१ वर्षीय अभिनव बिंद्राने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअररायफलमध्ये सुवर्ण जिंकून इतिहास घडवला होता. भारताचं हे ऑलिम्पिकमधील पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक होतं. त्यानंतर तो भारतातील आणि जागतिक स्तरावरही खेळाला संघटित रुप यावं म्हणून प्रयत्न करत आहे. २०१८ पासून तो ऑलिम्पिक परिषदेच्या ॲथलीट परिषदेचा सदस्य आहे. तर आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनचाही तो खेळाडू सदस्य आहे. खेळात बदल सुचवण्याचं महत्त्वाचं काम त्याने अभ्यासपूर्ण पद्धतीने केलं आहे. (Abhinav Bindra)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community