-
ऋजुता लुकतुके
बीसीसीआयने अलीकडेच भारतीय संघासाठी फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून सितांशू कोटक यांची नियुक्ती केली आहे. पण, त्यामुळे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरचं स्थान डळमळीत झालं आहे. गंभीर मुख्य प्रशिक्षक असताना त्यांच्या ताफ्यात फलंदाजीचा असा वेगळा प्रशिक्षक नव्हता. पण, अभिषेक नायरवरच फलंदाजांबरोबर काम करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, असं समजतंय. आणि आता सितांशू कोटक त्यासाठी आल्यावर अभिषेक नायरची तशी गरज उरणार नाही. शिवाय संघाबरोबर एक मुख्य प्रशिक्षक आणि ३ सहाय्यक प्रशिक्षक नेमण्याचाच प्रघात आहे. (Abhishek Nair)
(हेही वाचा- Mahakumbh 2025 : महाकुंभात स्फोटाची धमकी; 18 संशयित ताब्यात, संरक्षण मंत्री लष्कराच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार)
बीसीसीआयच्या आढावा बैठकीत गौतम गंभीरने फलंदाजीचा प्रशिक्षक हवा असल्याची मागणी केली होती. ऑस्ट्रेलियात असताना अभिषेक नायर खासकरून नवखे फलंदाज आणि तळाचे गोलंदाज यांच्याबरोबर काम करताना दिसला. ब्रिस्बेननंतर नायरने मेलबर्न कसोटीपूर्वी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्याबरोबर काही तास नेट्समध्ये घालवले. तर सिडनी कसोटीतही तो शुभमन गिल बाद झाल्यावर त्याच्याबरोबर आणि इतर संघात निवड न झालेल्या खेळाडूंबरोबर सराव करत होता. (Abhishek Nair)
माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनीही प्रशिक्षकांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते. ‘मुख्य फलंदाज फॉर्ममध्ये नसताना प्रशिक्षकांचा ताफा नेमकं काय करत होता? त्यांनी फलंदाजांना सल्ला दिला नाही का? त्यांना कामगिरी सुधारण्यासाठी मदत केली नाही का,’ असा थेट सवाल गावसकर यांनी विचारला होता. फलंदाजांच्या तंत्रामध्ये सुधारणा का दिसली नाही, असं त्याचं म्हणणं होतं. (Abhishek Nair)
(हेही वाचा- Sharad Pawar यांच्या गटातील ‘हा’ आमदार साथ सोडून अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार, शिर्डीमध्ये प्रवेश सोहळा निश्चित)
आता बीसीसीआयने सध्या चॅम्पियन्स करंडकापर्यंत सबुरीने वागायचं ठरवलं आहे. त्यानंतर संघाचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात येणार असल्याचं समजतंय. पण, फलंदाजीच्या प्रशिक्षकाची गरज असल्यामुळे सध्या सितांशू कोटक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते बीसीसीायच्या क्रिकेट अकादमीत कार्यरत आहेत. तसंच भारतीय ए संघाबरोबर त्यांनी दीर्घ काळ काम केलं आहे. त्यामुळे आता गौतम गंभीर बरोबर कोटक, मॉर्नी मॉर्केल, अभिषेक नायर, रायन टेन ड्युसकाटे आणि टी दिलीप असा प्रशिक्षकांचा ताफा आहे. पण, यात आगामी काळात बदल होऊ शकतो. (Abhishek Nair)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community