Abhishek Nair : सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायरची जबाबदारी नेमकी काय? – सुनील गावसकर 

72
Abhishek Nair : सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायरची जबाबदारी नेमकी काय? - सुनील गावसकर 
Abhishek Nair : सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायरची जबाबदारी नेमकी काय? - सुनील गावसकर 
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाला मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध ०-३ ने मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांच्या रणनीतीवर तर चर्चा होतेच आहे. शिवाय गंभीर यांचा सहाय्यक प्रशिक्षक वर्गही आता चर्चेत आला आहे. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी करत आहे. आणि त्याचवेळी सुनील गावसकर यांनी प्रशिक्षक वर्गाबद्दल उघड सवाल केला आहे. (Abhishek Nair)

(हेही वाचा- Maharashtra Assembly Election 2024 : भाजपचे बंडखोर, अपक्ष उमेदवारी, आवाहन मात्र तुतारीला मत देण्याचे; नेमके काय घडले ?)

गंभीरबरोबर रायन टेन ड्युसकाटे, अभिषेक नायर आणि मॉर्नी मॉर्केल हे तीन सहाय्यक प्रशिक्षक नव्याने भरती झाले आहेत. तर टी दिलीप क्षेत्ररक्षाचे प्रशिक्षक म्हणून संघाबरोबर कायम आहेत. यातील मॉर्नी मॉर्केल हे गोलंदाजीचे प्रशिक्षक आहेत. पण, ड्युसकाटे आणि अभिषेक नायर यांच्यावरील नेमकी जबाबदारी काय असा प्रश्न खुद्द गावसकर यांनाच पडला होता. मग मुलाखतकाराने त्यांना सांगितलं की, ‘दोघांवर फलंदाजी आणि सहाय्यक प्रशिक्षकाची एकत्रित जबाबदारी आहे.’ या उत्तरानंतर सुनील गावसकर यांनी आपलं हसू महत्प्रयासाने लपवलं. (Abhishek Nair)

‘फलंदाजीच अभिषेक नायरची भूमिका नेमकी काय आहे? ड्युसकाटे आणि नायर दोघांचा विचार केला तर गंभीरला त्या दोघांपेक्षा मिळून जास्त अनुभव आहे. ऑस्ट्रेलियात फलंदाजांची तयारी कशी असली पाहिजे, त्यांनी कोणत्या चुका टाळाव्यात हे गंभीर जास्त योग्य पद्धतीने सांगू शकतो. अशावेळी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नायर असू शकतो. पण, दुहेरी जबाबदारी म्हणजे नेमकं काय? आणि दोघांवर एकच जबाबदारी कशी असू शकते? प्रशिक्षकांमधली गोंधळाचं वातावरणही दूर केलं पाहिजे,’ असं सुनील गावसकर स्पोर्ट्सतक वाहिनीवर बोलताना म्हणाले. (Abhishek Nair)

(हेही वाचा- शरद पवारांबाबातच्या वक्तव्यानंतर Sadabhau Khot यांची जाहीर माफी)

गौतम गंभीरलाही त्यांनी कडक इशारा दिला. ‘गौतम गंभीरचा मधुचंद्राचा कालावधी आता संपला आहे. त्याचं संघाबरोबर असणं आणि त्यामुळे संघात पडलेला फरक त्याने आता दाखवून द्यायला पाहिजे. त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा व्हायला पाहिजे,’ असं गावसकर म्हणाले. (Abhishek Nair)

गौतम गंभीर यांच्यावर बोर्डर – गावसकर मालिकेत नक्कीच लक्ष असणार आहे. संघ निवडीच्या बाबतीत त्यांनी घेतलेले निर्णयांचीही चिकित्सा होणार आहे. (Abhishek Nair)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.