सनरायझर्स हैदराबादने शनिवारी (दि.१२) हैदराबादच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवला आहे. या सामन्यादरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) इतिहास रचला आहे.त्याने ५५ चेंडूत १४१ धावांची मॅच विनिंग खेळी केली. आयपीएलमधील पहिले शतक झळकावताना अभिषेक शर्माने खास विक्रमाला गवसणी घातली आहे. (Abhishek Sharma)
हेही वाचा-Thane : खडवलीत अवैध वसतिगृहात लैंगिक शोषण; २९ बालकांची सुटका, पाच जणांवर गुन्हा दाखल
पंजाब विरुद्धच्या सामन्यात २५६.३६ च्या स्ट्राइक रेटसह १४ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १४१ धावांची खेळी करत अभिषेक शर्मानं (Abhishek Sharma) भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आपल्या नावे केला. याआधी हा विक्रम लोकेश राहुलच्या नावे होता. केएल राहुलनं २०२० च्या हंगामात आरसीबीकडून खेळताना वानखेडेच्या मैदानात मुंबई इंडियन्स विरुद्ध ६९ चेंडूत १३२ धावांची खेळी केली होती. आयपीएलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत तो आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत ख्रिस गेल १७५ धावांसह पहिल्या तर ब्रेंडन मॅक्युलम १५८ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (Abhishek Sharma)
हेही वाचा- Pune Crime : सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल !
अभिषेक शर्मानं ४० चेंडूत आयपीएलमधील पहिले शतक साजरे केले. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत भारतीय खेळाडूच्या भात्यातून निघालेली ही तिसरे जलद शतक आहे. या यादीत युसूफ पठाण ३७ चेंडूतील शतकासह अव्वलस्थानावर आहे. आणि प्रियांश आर्य (३९) नंतर भारतीय खेळाडू अभिषेक शर्माचे तिसरे सर्वात जलद शतक ठरले. (Abhishek Sharma)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community