Archery World Cup : तिरंदाजीच्या विश्वचषकात भारताला ऐतिहासिक सुवर्ण 

Archery World Cup : भारताच्या पुरुषांच्या संघाने रिकर्व्ह प्रकारात विश्वविजेत्या कोरिया संघाला पराभवाचा धक्का दिला

131
Archery World Cup : तिरंदाजीच्या विश्वचषकात भारताला ऐतिहासिक सुवर्ण 
Archery World Cup : तिरंदाजीच्या विश्वचषकात भारताला ऐतिहासिक सुवर्ण 
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या तरुणदीप राय (Tarundeep Rai), प्रशांत जाधव (Prashant Jadhav) आणि धीरज बोमादेवरा (Dheeraj Bomadewara) या युवा तिरंदाजांनी नेत्रदीपक कामगिरी करताना विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात भारताला सांघिक सुवर्ण मिळवून दिलं. ते मिळवताना भारतीय संघाने ऑलिम्पिक चॅम्पियन (Archery World Cup) दक्षिण कोरियाच्या संघाचा पराभव केला. १४ वर्षांनंतर भारतीय संघाने विश्वचषक विजेतेपद पटकावलं आहे. आणि भारतीय खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या दिशेनं मजबूत पाऊल टाकलं आहे. (Archery World Cup)

(हेही वाचा- Babar Azam Record : बाबर आझम बनला टी-२० च्या इतिहासातील सर्वाधिक चौकार ठोकणारा फलंदाज )

भारताने अंतिम सामना ५ विरुद्ध १ सेटने जिंकला. तरुणदीप राय (Tarundeep Rai) हा ४० वर्षीय अनुभवी खेळाडू भारताच्या २०१० मधील विजयी संघातही होता. तेव्हा तरुणदीप (Tarundeep Rai), राहुल बॅनर्जी (Rahul Banerjee) आणि जयंता (Jayanta) यांनी जपानला हरवत विजेतेपद पटकावलं होतं. यंदाच्या स्पर्धेत दक्षिण कोरियाला हरवताना भारतीय संघाने ५७-५७, ५७-५५ आणि ५५-५३ अशी कामगिरी केली. (Archery World Cup)

सध्या तिरंदाजी विश्वचषकाचा पहिला टप्पा शांघाय इथं सुरू आहे. भारतीय पथकाला मिळालेलं हे पाचवं सुवर्ण होतं. ५ सुवर्ण, २ रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई भारतीय पथकाने या स्पर्धेत केली आहे. रिकर्व्हच्या मिश्र सांघिक स्पर्धेत अंकिता भाकत आणि धीरज बोमादेवराने कांस्य पदक पटकावताना मेक्सिकोच्या जोडीचा ६-० असा पराभव केला. (Archery World Cup)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्याची निवडणूक भाजपाच्या गडात)

तर ज्येष्ठ महिला तिरंदाज दीपिका कुमारी या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय तिरंदाजीत पुनरागमन करत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये तिने बाळाला जन्म दिल्यानंतर ब्रेक घेतला होता. तिनेही पहिल्याच मोठ्या स्पर्धेत चांगली कामगिरी करताना महिलांच्या रौप्य पदकाची कमाई केली. खरंतर उपउपान्त्य आणि उपान्त्य फेरीत तिने दोन कोरियान तिरंदाजांना पाणी पाजलं होतं. पण, अंतिम फेरीत होआंगझाओ आशियाई खेळातील विजेत्या लिम झियेन विरुद्ध तिचा सरळ सेटमध्ये पराभव झाला. (Archery World Cup)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.