Achinta Sheuli Controversy : मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये दिसला स्टार खेळाडू; ऑलंम्पिकला जाण्याचं स्वप्न भंगलं

पटियालामध्ये पुरुष आणि महिला खेळाडुंसाठी वेगवेगळे हॉस्टेल आहे. सध्या महिला बॉक्सर, आणि कुस्तीपटू खेळाडू एनआयएसमध्ये राहत आहेत. पुरुष खेळाडुंनी येथे जाण्यास सक्त मनाई असते. तसे निर्देश खेळाडुंना आधीच दिलेले असतात.

249
Achinta Sheuli Controversy : मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये दिसला स्टार खेळाडू; ऑलंम्पिकला जाण्याचं स्वप्न भंगलं

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता वेटलिफ्टर अचिंत शेउली (Achinta Sheuli Controversy) याला एन. आय. एस. पटियाला येथील महिला वसतिगृहात रात्री प्रवेश करताना पकडण्यात आल्याने पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या राष्ट्रीय शिबिरातून बाहेर काढण्यात आले आहे. गुरुवारी (१४ मार्च) मध्यरात्री ही घटना घडली. पुरुषांच्या ७३ किलो वजनी गटात भाग घेणाऱ्या २२ वर्षीय अचिंतला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले. त्यामुळे त्याला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या शर्यतीमधून बाहेर काढण्यात आले आहे.

(हेही वाचा – Saina Nehwal : एका महिन्यात तिसर्‍यांदा प्रथम क्रमांक मिळवणारी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल)

भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,

असे बेशिस्त वर्तन सहन केले जाणार नाही. त्यामुळे त्याला ताबडतोब कॅम्प मधून काढण्यात आले आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय) आणि एनआयएस पटियालाचे संचालक विनीत कुमार यांना तातडीने माहिती देण्यात आली. व्हिडिओ पुरावे असल्यामुळे एस. ए. आय. ने चौकशी समिती स्थापन केली नाही. हा व्हिडिओ एनआयएस पटियालाचे संचालक विनीत कुमार आणि दिल्लीतील एसएआय मुख्यालयाला पाठवण्यात आला आहे. अचिंतला छावणीतून काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे.’ (Achinta Sheuli Controversy)

(हेही वाचा – Delhi Liquor Policy Scam Case : के. कविता यांना ७ दिवसांची ईडी कोठडी)

बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये अचिंतने (Achinta Sheuli Controversy) नवीन विक्रमासह सुवर्णपदक जिंकले.

(हेही वाचा – भाजपाकडून Rahul Gandhi यांचा निषेध)

शिस्तभंगामुळे कॅम्पमधून बाहेरचा रस्ता : 

पटियालामध्ये पुरुष आणि महिला खेळाडुंसाठी वेगवेगळे हॉस्टेल आहे. सध्या महिला बॉक्सर, आणि कुस्तीपटू खेळाडू एनआयएसमध्ये राहत आहेत. पुरुष खेळाडुंनी येथे जाण्यास सक्त मनाई असते. तसे निर्देश खेळाडुंना आधीच दिलेले असतात. दरम्यान, वेटलिफ्टिंग फेडरेशनने वेटलिफ्टरवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी काही खेळाडुंवर अशी कारवाई झाली होती. कॉमनवेल्थ आणि युवा ऑलिम्पिक चॅम्पियन जेरेमी लालरिनुंगा यालाही शिस्तभंगामुळे कॅम्पमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. (Achinta Sheuli Controversy)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.