पॅरालिम्पिकमध्ये या खेळाडूने घेतला पदकाचा अचूक वेध

पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू आपली उत्तम कामगिरी दाखवत आहेत. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. दोन सुवर्ण,चार रौप्य आणि एक कांस्य पदकासह भारताने घवघवीत यश कमावले आहे. त्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. पॅरा शूटर सिंहराज अधनाने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल P1 प्रकारात कांस्य पदकावर आपलं नावं कोरल आहे, या त्याच्या कामगिरीसोबतच भारताने आठ पदकं जिंकली आहेत.

सिंहराजची धमाकेदार खेळी

असाका शूटिंग रेंजमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात सिंहराज अधाना आणि चीनच्या लू शीयोलोंग आमने-सामने आले होते. दोघांमध्येही अटीतटीचा सामना रंगला होता. परंतु, शेवटी सिंहराजनं धमाकेदार खेळी करत 216.8 अंकासह कांस्य पदकावर आपलं नावं कोरलं.

अवनीनाची सुवर्ण कामगिरी

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये १० मीटर रायफल शूटिंगमध्ये भारताची नेमबाज अवनी लेखरा हीने सुवर्ण वेध घेतला. तिच्या अचूक नेमबाजीने तिला सोमवारी, ३० ऑगस्ट रोजी सुवर्ण पदक मिळाले. अवनीनाने १०४.९ आणि १०४.८ असा तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत स्कोर केला. अंतिम फेरीत तिने १०४. १ असा स्कोर केला.

वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक

भारताचा भालाफेकपटू सुमित अंतिलने पुरुष भालाफेक F64 स्पर्धेत एका नव्या वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक पटकावले. दुसरा थ्रो त्याने 68.08 मीटर लांब फेकला ज्यानंतर तिसरा आणि चौथा प्रयत्न इतका खास झाला नाही. पण पाचव्या प्रयत्नात अप्रतिम असा 68.55 मीटरचा थ्रो करत त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली. सोबतच एक नवा वर्ल्ड रेकॉर्डही सेट केलं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here