-
ऋजुता लुकतुके
अफगाणिस्तान संघाला अखेर विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यात यश आलं नाही. पण, अहमदाबादमध्ये असताना संघातील महत्त्वाच्या खेळाडूने आपल्या माणुसकीने लोकांची मनं जिंकली आहेत. जगभर हा व्हीडिओ व्हायरल होतोय. (Afghan Cricketer Helps Homeless)
अफगाणिस्तानचा सलामीवीर फलंदाज रहमतुल्ला गुरबाज याचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात हा क्रिकेटपटू रात्री तीन वाजताच्या सुमारास अहमदाबाद इथं रस्त्यावर झोपलेल्या बेघर लोकांना काही पैसे देताना दिसतो आहे. (Afghan Cricketer Helps Homeless)
रहमतुल्ला आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो आणि या संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हीडिओ प्रसारित करण्यात आला. त्यानंतर हजारो लोकांनी तो पाहिलाय. ‘अफगाणिस्तानमधून एक देवदूत अहमदाबादच्या रस्त्यांवर अवतरला होता. मायदेशात हेरात इथं झालेल्या भूकंपानंतर तिथल्या पीडितांसाठी पैसे गोळा करण्यासाठी त्याने अथक धडपड केली आणि आता अहमदाबादच्या रस्त्यांवर झोपणाऱ्या बेघरांना तो आपल्याकडचे पैसे देतोय. जानी, तू इतरांनाही यातून प्रेरणा देतोयस. दव तुझं भलं करो!’ असं या ट्विटर संदेशात कोलकाता नाईट रायडर्सनी म्हटलं आहे. (Afghan Cricketer Helps Homeless)
अफगानिस्तान से आया एक फरिश्ता 🥹
RJ Love Shah spotted @RGurbaz_21 near his home in Ahmedabad, quietly spreading some love ahead of Diwali, hours before the Afghanistan team returned home after their heartwarming World Cup journey ended on Friday night.
🎥: RJ Love Shah |… pic.twitter.com/TOeUBKwXwh
— KolkataKnightRiders (@KKRiders) November 12, 2023
रहमतुल्ला आपल्या उदारतेसाठी प्रसिद्ध आहे आणि क्रिकेटमुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा वापर तो विधायक कामांसाठी करतो. संघाच्या विश्वचषकातील कामगिरीवर मात्र तो काहीसा नाराज आहे. संघाकडे काही संधी चालून आल्या होत्या पण, त्या खेळाडूंनी दवडल्या, असं त्याला वाटतं. (Afghan Cricketer Helps Homeless)
(हेही वाचा – BEST : भाऊबीजेसाठी ‘बेस्ट’च्या जादा बसगाड्या)
अफगाणिस्तानला शेवटचे दोन साखळी सामने बाकी असेपर्यंत उपांत्य फेरीची संधी होती. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मुंबईतील सामन्यात तर त्यांनी २९० धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे पहिले सात फलंदाज ९१ धावांमध्ये बाद केले होते. पण, ग्लेन मॅक्सवेलला ते बाद करू शकले नाहीत आणि मॅक्सवेलने २०१ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. (Afghan Cricketer Helps Homeless)
त्यानंतर अहमदाबाद इथं दक्षिण आफ्रिकेनंही त्यांचा सहज पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानचे ९ सामन्यांतून ८ गुण झाले. आणि उपांत्य फेरीची त्यांची संधी हुकली. पण, पाकिस्तान आणि गतविजेते इंग्लंड यांच्यावर मात केल्यामुळे अफगाण संघ या स्पर्धेतील जायंट कीलर ठरला आहे. (Afghan Cricketer Helps Homeless)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community