ऋजुता लुकतुके
अफगाणिस्तान संघाच्या (Afghanistan’s Win Over Pakistan) या विश्वचषकातील कामगिरीने एक भारतीय व्यक्तीही सध्या खुश आहे. ही व्यक्ती अफगाण जर्सी घालून त्यांच्या डगआऊटमध्ये बसलेली असते. आणि संघातील खेळाडूंशी चेष्टा मस्करी बरोबरच क्रिकेटचे ज्ञानही वाटत असते. ही व्यक्ती आहे भारताचा माजी कर्णधार आणि अफगाण संघाचा मेंटॉर अजय जाडेजा. मेंटॉर म्हणजे मार्गदर्शक.
या विश्वचषक स्पर्धेत अजय जाडेजा ही भूमिका बजावत आहे. त्याच्या कामगिरीचं मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि पाकचा माजी तेज गोलंदाज शोएब मलिक अशा दोघांनी कौतुक केलं आहे. अफगाण संघाने पाकला हरवण्यापूर्वी गतविजेत्या इंग्लंड संघालाही धूळ चारली होती.
पाकबरोबरच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरने ट्विटरवर एक खास पोस्ट लिहिली आहे. ‘अफगाणिस्तानचा या विश्चचषकातील आतापर्यंतचा प्रवास अफलातून आहे. यात नक्कीच माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जाडेजाचाही प्रभाव असावा,’ असं सचिनने ट्विटरवर लिहिलं आहे.
Afghanistan’s performance at this World Cup has been nothing short of outstanding. Their discipline with the bat, the temperament they’ve shown, and aggressive running between the wickets reflects their hard work. It could possibly be due to a certain Mr. Ajay Jadeja’s influence.… pic.twitter.com/12FaLICQPs
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 23, 2023
सीमेपलीकडे पाकिस्तानमध्ये बसून हा सामना पाहणारा पाकचा माजी तेज गोलंदाज शोएब मलिकनेही अजय जाडेला अफगाण विजयाचं श्रेय दिलं आहे. ‘मी अजय जाडेजा बरोबर २०१५ च्या विश्वचषकात एका वाहिनीसाठी समालोचन केलं आहे. त्याची क्रिकेट विषयीची जाण मी ओळखून आहे. त्या त्या परिस्थितीत कसं खेळावं हे तो चांगलं ओळखतो. आणि भारतीय वातावरणाविषयी त्याला चांगली माहिती आहे,’ असं शोएब मलिकने म्हटलं आहे.
पाकिस्तानमध्ये अजय जाडेजाच्या अफगाणिस्तान (Afghanistan’s Win Over Pakistan)संघाबरोबर असण्यावरून आणखीही काही प्रतिक्रिया आल्या आहेत. अजय जाडेजा पाकिस्तान विरुद्ध चांगलं प्रदर्शन करणारा फलंदाज म्हणून ओळखला जायचा. खास करून वकार युनूसला बंगळुरूतच त्याने लगावलेले ३ षटकार चाहत्यांच्या स्मरणात आहेत. आणि पाक वि. अफगाणिस्तान सामनाही बंगळुरूमध्येच झाला.
Ajay Jadeja ne humein 1996 mein Bangalore mein maara tha aur aaj Chennai mein bhi humein harra dia. Maan gaye ustaad 🙏🏽🙏🏽 #CWC23 #PAKvsAFG pic.twitter.com/QoLxB0rM8T
— Farid Khan (@_FaridKhan) October 23, 2023
सोमवारी अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या २८२ धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना ८ गडी राखून आरामात विजय मिळवला. सलामीवीर रहमनुल्ला गुरबाझ (६५) आणि इब्राहिम झरदान (८५) यांनी चांगली पायाभरणी संघाला करून दिली. आणि अफगाणिस्तानने ४८ व्या षटकातच विजय साकार केला. त्याचबरोबर गुणतालिकेतही त्यांनी सहाव्या स्थानावर झेप घेतली.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community