आशिया कप २०२३ (Asia Cup 2023) च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा डाव ५० धावांवर गुंडाळला. भारतीय गोलंदाजांचा समोर श्रीलंकेचा संघ पुरता ढासळला. सिरजने भेदक मारा करत सात विकेट घेतले. तर, पांड्यानेही तीन गडी बाद केले. पण ही दमदार कामगिरी करत असताना भारताने तब्बल २३ वर्षांनी हा बदला घेतल्याचे आता समोर आले आहे. कारण भारत आणि श्रीलंका यांच्यात २००० साली वनडे सामना झाला होता. या सामन्यात श्रीलंकेने भारताची अशीच अब्रु काढली होती. पण आता मात्र भारताने त्या गोष्टीचा चांगलाच बदला घेतला आहे.
भारतीय संघाने १९९९ च्या बदला घेतला आहे. अखेर २४ वर्षांनंतर टीम इंडियाने वचपा काढला आहे. १९९९ च्या कोको-कोला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेने भारताला अवघ्या ५४ धावांवर बाद केलं होतं. आता तब्बल २४ वर्षांनंतर भारताने वचपा काढत श्रीलंकेला ५० धावांवर सर्वबाद केलं. भारताने फक्त ५० धावांत श्रीलंकेला ऑल आऊट केले.
India 54 all-out in the Coco-Colo Champions Trophy final in 1999 vs SL.
Sri Lanka 50 all-out in the Asia Cup final in 2023 vs IND.
Revenge has taken after 24 years. pic.twitter.com/0fAYzmDPkm
— Johns. (@CricCrazyJohns) September 17, 2023
(हेही वाचा : IND Vs SL Final Asia Cup : श्रीलंकेचा धुव्वा उडवत भारताने आठव्यांदा जिंकला आशिया चषक)
मोहम्मद सिराज ठरला टीम इंडियाच्या विजयाचा ‘सूपरहिरो’
आशिया चषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. टीम इंडियाने श्रीलंकेला ५० धावांवर ऑलआउट केलं. प्रत्युत्तरात अवघ्या ६. १ षटकांत एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठलं. मोहम्मद सिराज टीम इंडियाच्या विजयाचा ‘सूपरहिरो’ ठरला होता. सिराजने७ विकेट घेतल्या. तर शुभमन गिल आणि इशान किशन यांच्या सलामी जोडीनं फलंदाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. शुभमन गिलने नाबाद २७ तर ईशान किशनने नाबाद २३ धावा केल्या.