- ऋजुता लुकतुके
विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवने तडाखेबंद फलंदाजी करत ८३ धावा केल्या. त्याच्या फटकेबाजीवर स्टेडिअममध्ये जमलेले चाहते खुश होते. त्यातल्याच एकाला सूर्याने आपली जर्सी देऊन खुश केलं. भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार सूर्यकुमार यादवने विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ४४ चेंडूत ८३ धावा केल्या. यात त्याने ४ षटकार आणि १० चौकार ठोकत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने या मालिकेतलं आव्हानही कायम राखलं आहे.
आपल्या तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला सूर्यकुमार प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय आहे. अशाच एका चाहत्याला काल सूर्यकुमारने आपल्या डावानंतर खुश केलं. कालच्या सामन्यात घातलेली जर्सी त्याने सही करून एका चाहत्याला भेट दिली. भारतीय वंशाचा हा गयानीज चाहता दिव्यांग आहे. आणि व्हिल चेअरवर बसून हा सामना पाहायला आला होता. सामना संपल्यानंतर तो भारतीय ड्रेसिंग रुममध्येही आला. आणि सूर्याने चक्क त्याला आपली जर्सी भेट दिली. हा चाहता त्यामुळे अतिशय खुश झाला. हा व्हीडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर आज प्रसिद्ध केला आहे.
The fans in Guyana witnessed a SKY special in the 3rd #WIvIND T20I 💥
Not much later, they got to meet the Player of the match @surya_14kumar himself 😃👌 #TeamIndia pic.twitter.com/xE6pKGtBgD
— BCCI (@BCCI) August 9, 2023
(हेही वाचा – Swine Flu : राज्यात पाच दिवसांमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णात वाढ, १७८ नव्या रुग्णांची नोंद)
सूर्यकुमार आपल्या चाहत्यांना कधी नाराज करत नाही. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करतानाही तो अनेकदा चाहत्यांची सेल्फीची इच्छा पूर्ण करतो. हाँग काँग संघाचा कर्णधार निजाकत खानलाही अलीकडेच सूर्याने आपली बॅट भेट दिली होती. कालच्या सामन्यात सूर्याला सामनावीराचा मानही मिळाला. सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना सूर्याने संघाच्या सर्वांगीण कामगिरीसाठी समाधान व्यक्त केलं.
‘गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही प्रकारात संघाची कामगिरी चांगली झाली आणि प्रत्येकाने आपली भूमिका चोख निभावली हे खूप महत्त्वाचं आहे,’ असं सूर्यकुमार म्हणाला. शिवाय आपल्या कामगिरीमुळे संघाने मालिकेतील आव्हान कायम राखलं याबद्दलही त्याने समाधान व्यक्त केलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community